जंपसूटसोबत ट्राय करा या फुटवेअर

जंपसूटसोबत ट्राय करा या फुटवेअर

जंपसूट आऊटफिट आजकाल महिलांमध्ये खूप ट्रेंडिंगवर आहे. कॉलेजला जाणाऱ्या मुलगी असो वा वर्किंग वूमन कित्येक महिला जंपसूटला पसंती देतात. जंपसूट हा एक परफेक्ट आऊटफिट आहे. जंपसूटमध्ये तुम्हाला खूप कम्फर्टेबल तर वाटतेच शिवाय स्टायलिश लूकही मिळतो. पण, जंपसूटसोबत कोणते फुटवेअर घालायचे याबाबत अनेक जणींचा गोंधळ उडतो. तुमचाही जंपसूट घालताना त्यावर कोणत्या फुटवेअर घालायचा असा गोंधळ उडतो का? मग ही बातमी तुमच्यासाठी.

स्ट्रॅपी हिल्स –

जर तुम्ही जंपसूट घालून मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जात असाल तर स्ट्रॅपी हिल्स नक्की ट्राय करा. जंपसूट आऊटफिटसोबत अशा हिल्स परफेक्ट लूक देतात. जर तुम्ही डार्क किंवा काळ्या रंगाच्या जंपसूट घालणार असाल तर त्यावर रेड, ग्रीन, व्हाईट रंगाच्या स्ट्रॅपी हिल्स घालू शकता. या स्ट्रॅपी हिल्स मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतात.

मिडीयम हिल्स सँडल –

जर तुम्हाला हिल्स घालायला आवडत असतील तर जंपसूटसोबत मिडीयम हिल्स सँडल घालू शकता. यात तुम्हाला विविध डिझाइन आणि रंग असलेले सँडल मार्केटमध्ये मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगानुसार त्या आऊटफिटसोबत ट्राय करू शकता. मिडीयम हिल्स सँडल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही ठिकाणांहून स्वस्त दारात तुम्ही मिडीयम हिल्स सँडल खरेदी करू शकता आणि हे तुम्हाला स्वस्त दरातही मिळेल.

स्केवर हिल्स सँडल –

जर तुम्ही नवीन काही तरी ट्राय करण्याच्या विचारात असाल तर स्केवर हिल्स सँडल वापरू शकता. हे सँडल फ्लॅटसारखे दिसते पण यात थोडी हिलसुद्धा असते. हलक्या आणि डार्क रंगाच्या जंपसूटसोबत स्केवर हिल्स सँडल उत्तम पर्याय ठरेल. सर्व प्रकारच्या जंपसूटसोबत असे सँडल परफेक्ट दिसतातच शिवाय एक हटके लूकही तुम्हला मिळतो. यात तुम्हाला अनेक रंगाचे ऑप्शन दिसतील, जे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन असा दोन्ही ठिकाणांहून स्वस्त दरात खरेदी करू शकता.

 

 

 


हेही पहा : मंगळसूत्र घालण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

 

Edited By – Chaitali Shinde

 

First Published on: April 28, 2024 12:24 PM
Exit mobile version