Holi 2024 : होळी पार्टीत ‘या’ आउटफिटमध्ये दिसाल हटके

Holi 2024 : होळी पार्टीत ‘या’ आउटफिटमध्ये दिसाल हटके

दरवर्षी होळी साजरी करण्याची तयारी अगोदरच सुरू होते. कुणी आपल्या घरी पार्टी ठेवली तर अनेक ठिकाणी ऑफिसमध्ये पार्टी केली जाते. तिथे सगळे तयार होऊन होळी खेळतात. यंदा होळीचा सण 25 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. अशा स्थितीत प्रत्येकजण त्याची पूर्वतयारी सुरू करेल. जर तुम्हीही होळीच्या पार्टीला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अगोदरच आरामदायक कपड्यांची खरेदी करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला होळीच्या पार्टीचा आनंद घेता येईल.

कुर्ती 

होळीच्या पार्टीत प्लाझो किंवा  जीन्ससोबत पांढऱ्या रंगाची प्रिंटेड कुर्तीही घालू शकता. तुम्ही त्याच्या बरोबर एक सार्डिन देखील जोडू शकता जेणेकरून तुमच्यावर पाणी पडले तर तुम्हाला त्रासदायक वाटणार नाही. यासाठी तुम्हाला हवे असल्यास बाजारातून 200/300 रुपयांना चांगला सुती कुर्ता खरेदी करू शकता. ते परिधान करून तुम्ही थीमनुसार तयार व्हाल.

शॉर्ट कुर्ती

तुम्हाला स्टायलिश आणि कम्फर्टेबल व्हायचे असेल तर होळी पार्टीत पँटसोबत शॉर्ट कुर्ती घालू शकता. तुम्ही कॉटन स्टॉल्स देखील घेऊ शकता. यामुळे तुम्ही हटके आणि आरामदायी दिसाल. होळीनिमित बाजारात प्रिंटमध्ये अनेक कुर्त्या तुम्हाला मिळतील.

चमकदार ब्लाउजसह ऑफ व्हाइट साडी

चमकदार रंगाच्या ब्लाउजसह क्लासिक ऑफ व्हाइट साडीचा विचार करता येईल. यामध्ये तुम्ही केस मोकळे ठेवा किंवा केसांचा बन केला तरी चालेल. ऑक्सिडाइज्ड इअररिंगसह हा आउटफिट चांगला दिसेल.

शरारासह क्रॉप टॉप

 

रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही शरारासोबत क्रॉप टॉप घालू शकता. हे तुम्हाला इथनिक लुक देईल. मॅचिंग क्रॉप टॉपसह पांढरा शरारा घाला. त्यासोबत शूज आणि कानातले घाला. रंगपंचमीसाठी हा परफेक्ट लुक आहे. या आउटफिट्समध्ये तुमची छायाचित्रे देखील खूप सुंदर दिसतील.

शर्ट ड्रेस

कंफर्ट राहण्यासाठी या दिवशी तुम्ही शर्ट ड्रेस देखील घालू शकता. तुम्ही मोठ्या आकाराचा शर्ट ड्रेस घालू शकता. या लुकसाठी तुमच्या ड्रेससोबत ब्राऊन बेल्ट आणि पांढरे स्नीकर्स घाला. स्टड इअररिंग्स आणि सनग्लासेससह तुम्ही अधिक छान दिसाल.

First Published on: March 12, 2024 4:25 PM
Exit mobile version