Perfect Jeans Tips : बॉडी शेपनुसार योग्य जीन्स कशी निवडावी?

Perfect Jeans Tips : बॉडी शेपनुसार योग्य जीन्स कशी निवडावी?

डेनिम ही आजच्या काळातील फॅशन आहे. जवळपास सर्वजण डेनिम वापरतात. हा असा एक प्रकार आहे जो  प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये सापडेल. पण अनेकांना स्वत:साठी योग्य जीन्स कोणती हे अनेकांना समजत नाही पण काळजी करू नका. आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही योग्य जीन्स निवडू शकता. जीन्स निवडताना तुमच्या शरीराच्या खालच्या भागाकडे, म्हणजे तुमच्या खालच्या शरीराकडे, जसे की तुमच्या मांड्या, नितंब इ.कडे लक्ष द्या. याशिवाय, तुमची उंची देखील एक महत्त्वाचा घटक आहे, जीन्स निवडताना तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे.

उंच स्कीनी जिन्स

आजकाल हाय राइज बॉटम्सची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. डेनिम जीन्समध्येही हा ट्रेंड फॉलो केला जात आहे. या जीन्स कंबरेच्या वर परिधान केल्या जातात, त्यामुळेच कमरेच्या खालचा भाग आकारात दिसतो. जर तुम्ही हेवी हिप्समुळे हैराण असाल तर वेलबॉटम स्टाइल जीन्स तुमच्यासाठी योग्य पर्यांय आहे.

स्ट्रेट फिट जीन्स

जर तुमचा लठ्ठपणा वाढत असेल आणि तुम्ही जीन्स घालण्यात संकोच करत असाल किंवा कोणतीही जीन्स तुम्हाला शोभत नसेल तर तुम्ही स्ट्रेट फिट जीन्स पॅन्ट घालावी. या प्रकारची जीन्स हेल्दी असलेल्या स्त्रियांवर चांगली दिसते. काळ्या, नेव्ही ब्लू आणि गडद रंगांमधील जीन्स तुमच्या शरीराला एक सुंदर लुक देईल.

बुटकट जिन्स

बूटकट जीन्स गुडघ्यापर्यंत टाइट असतात आणि खाली फ्लेअर असतात. ही जीन्स स्टाइल आजची नाही. ती 90 च्या दशकातल्या हिरॉइन्स खूप घालायच्या. आता तीन दशकं लोटली असली तरी या जीन्सची फॅशन अद्याप संपलेली नाही.

वाइड लेग जीन्स

वाइड लेग जीन्स स्किनी (सडपातळ) मुलींसाठी सर्वांत बेस्ट ऑप्शन आहे. या जीन्स घट्ट टॉपवर घालता येतात. ही जीन्स शूज आणि हील्स दोन्हीवर चांगली दिसते.

हेही पहा :

लो वेस्ट जीन्स

या प्रकारच्या जीन्स बेली बटणाच्या अगदी खाली घातल्या जातात आणि ज्यांची कंबर चांगली टोन्ड आहे त्यांना उत्तम दिसतात.

या गोष्टी लक्षात ठेवा

First Published on: April 23, 2024 6:26 PM
Exit mobile version