बटाटा जुना आहे की नवा कसा ओळखायचा?

बटाटा जुना आहे की नवा कसा ओळखायचा?
प्रत्येक जण जेवणात बटाटे वापरतात आणि बटाट्यापासून प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनविल्या जातात. तसेच बटाट्याचा वापर शाकाहारी जेवणात तर होतोच. पण काही लोक मांसाहारमध्ये देखील बटाट्याचा करताता. त्यामुळे बटाट्याशिवाय तुमचे जेवणाचे ताट अपूर्ण आहे.
पण कधी कधी जेवण बनविल्यानंतर कळते की, बटाटे गोड होते, याचा अर्थ तो बटाटा जुना होता. बाजारात दरवर्षी काही नवे बटाटे येतात, पण नवीन आणि जुन्या बटाट्यात फरक काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? , नवीन आणि जुने बटाट्यात काय फरक आहे ते आपण आज जाणून घेऊ या.

नवीन-जुना बटाट्यातील काय फरक असतो

नवीन बटाटा म्हणजे काय?

नवीन बटाट ज्याला बेबी पोटॅटो असेही म्हणतात. हे बटाटे पूर्ण पिकण्यापूर्वी जमिनीतून काढले जातात. नवीन बटाटे लहान असतात, असे म्हटले जाते आणि या बटाट्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. कारण नवीन बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन-सी, रिबोफ्लेविन, नियासिन, थायामिन आणि व्हिटॅमिन-के याचे प्रमाण जास्त असते आणि हा बटाट्याची चव देखील चांगली असते.

जुना बटाटा कसा ओळखायचा

 बटाटे हे जितके जास्त गोड ते तितके जुने असतात. कारण बटाट्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स हळूहळू साखरेत रुपांतरित होतात.  जुन्या बटाट्याची चव फारशी चांगली नसते, कारण जेव्हा बटाट्यावर जास्त सूर्यप्रकाश पडतो. तेव्हा त्याची चव बदलू लागते, असे मानले जाते. त्यामुळे लोक नवीन बटाट्यापेक्षा जुना बटाटा लोक कमी खातात.

नवी-जुन्या बटाट्याच्या चवीत फरक

नवीन बटाट्यातील पौष्टिक आणि चवीमध्ये खूप फरक आहे. नवीन बटाटे गोड असतात. जुने बटाटे थोडे कठीण असतात आणि चव फार चांगली नसते. तसेच जुना बटाटे जास्त वेळ शिजवावे लागते
First Published on: July 20, 2023 6:25 PM
Exit mobile version