Kitchen Tips : भाजीत मीठ जास्त झाले, मग असा करा बॅलन्स

Kitchen Tips : भाजीत मीठ जास्त झाले, मग असा करा बॅलन्स

मीठ जेवणाची चव वाढवण्याचे काम करते. भाजीमध्ये मीठ कमी असल्यास त्याची चव कमी होऊ लागते. पण चव संतुलित करण्यासाठी मीठ देखील जोडले जाऊ शकते. पण भाजीत मीठ जास्त झालं की जेवणाचा मूड जातो. अशावेळी एकतर ती भाजी फेकून द्यावी लागते. नाहीतर तिच्यापासून नवीन पदार्थ बनवावा लागतो. पण ते वेळखाऊ काम आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने खारट भाजी बॅलन्स करता येते.

बेसन पीठ

भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात अंदाजाने थोडेसे भाजलेले बेसन टाकावे. बेसन भाजीतील मीठ शोषून घेते. त्यामुळे खारटपणा कमी होतो. ही टिप्स सुक्या आणि रस्सा भाजीसाठीही वापरता येते.

कणकेच्या गोळ्या

भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात कणकेचे गोळ्या टाकाव्यात. कणिक मीठ शोषून घेते. त्यामुळे भाजीतले ज्यादा मीठ आपोआपच कमी होते. ही पद्धत रस्सा भाज्या आणि डाळींचे मीठ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

उकडलेला बटाटा

डाळीत किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यात उकडलेला बटाटा टाकावा. त्यामुळे त्यातील मीठ कमी होते. त्याचबरोबर भाजी किंवा पातळ डाळही घट्ट होते.

लिंबाचा रस

खारट झालेल्या भाजीत अंदाजाने लिंबाचा रस टाकावा. त्यामुळे त्याचा खारटपण कमी होतो. तसेच पदार्थाची चवही वाढते. हा उपाय खूपच सोपा आणि साध्या पद्धतीने आपण करू शकतो.

ब्रेडचा वापर करा

भाज्या आणि डाळींमध्ये मीठ जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही ब्रेडचाही वापर करू शकता. यासाठी भाजी आणि मसूरमध्ये ब्रेडचे एक-दोन तुकडे टाका आणि मिनिटभर राहू द्या आणि नंतर काढा. यामुळे मीठ कमी होईल आणि चवही वाढेल.

First Published on: March 30, 2024 6:48 PM
Exit mobile version