Papad Recipe- न लाटता बनवा कर्रSSम कुर्रSSम इन्स्टंट पापड

Papad Recipe-  न लाटता बनवा कर्रSSम कुर्रSSम इन्स्टंट पापड

उन्हाळा सुरू होताच घराघरांत महिलांची पापड बनवण्याची लगबग सुरू होते. पापड बनवण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. यामुळे तितका वेळ मिळत नसल्याने आणि मदतीस कोणी नसल्याने बरेचजण बाजारातून तयार पापड विकत घेतात. पण आज आपण न लाटता झटपट तयार करता येणाऱ्या इंन्टंट पापडाची रेसिपी बघणार आहोत. हे झटपट पापड तुम्ही अगदी कमी वेळात घरी बनवू शकता आणि महिनाभर ठेवू शकता.

साहीत्य-

१ कप मैदा
8 कप पाणी
२ चमचे जिरे
चिमूटभर खाण्याचा ऱंग
चवीनुसार मीठ
एक चमचा तिखट
प्लास्टिक पेपर

कृती-

झटपट पापड बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मैदा, मीठ आणि दोन कप पाणी.रंग घालून मिक्स करा.
हे मिश्रण नीट ढवळून झाल्यावर पॅनमध्ये ठेवा.
आता त्यात जिरे,५ वाट्या पाणी घालून गुळगुळीत पीठ बनवा आणि गॅसवर मध्यम आचेवर शिजवा.
मैदा आणि पाणी 15-20 मिनिटे नीट शिजवून घ्या म्हणजे कच्चापणा निघून जाईल.
पापड मिश्रण वेगळे व्हायला लागल्यावर गॅस बंद करा
मिश्रण नीट ढवळून झाल्यावर प्लॅस्टिक पेपर उन्हात पसरवा.
आता पापड मिश्रण प्लास्टिकच्या पेपरवर थोडं थोडं टाका.
पापड चमच्याने सारखे पसरवून उन्हात वाळवा.
दोन-तीन दिवस उन्हात सुकवावे
3-4 दिवसांनी पापड प्लेटमध्ये ठेवा, कोरडे होऊ द्या.
पापड सुकल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा


Edited By-Aarya Joshi

First Published on: April 25, 2024 5:12 PM
Exit mobile version