Sunday, May 12, 2024
घरमानिनीRecipeRecipe Mango Cake - आंबा रवा केक

Recipe Mango Cake – आंबा रवा केक

Subscribe

आंब्याचा सिझन सुरू झाला असून बाजारात हापूस, पायरी ते केसर असे विविध प्रकारचे आंबे आले आहेत. प्रामुख्याने आंब्याच्या फोडी किंवा आंब्याचा रस खाल्ला जातो. तसेच आंब्याचे आईस्क्रीमही बनवले जाते. पण आज आपण आंबा आणि रव्याच्या मिक्स केकची रेसिपी बघणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

१ कप आंबा

१ कप रवा

- Advertisement -

अर्धा कप साखर

पाव कप तेल

४ कप दूध

1 टीस्पून बेकिंग पावडर

पाव कप बदाम

कृती-

सर्वप्रथम मिक्सर ग्राइंडरमध्ये रवा बारीक वाटून घ्यावा . नंतर मिक्सरमध्ये आंब्याच्या फोडी (साल काढलेल्या) आणि साखर एकत्र ग्राईंड करून घ्या. केकपात्रात रवा आणि आंबा साखरेची पेस्ट एकत्र फेटून घ्या.

त्यात अर्धा कप दूध घालून मिक्स करा. मिश्रण 30 मिनिटे झाकून ठेवा .

नंतर त्यात बेकिंग पावडर घाला आणि चांगले मिसळा.

उरलेले दूध घालून केकचं घट्ट पीठ करा.

ओव्हन 180 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करा.

बेकिंग टिनमध्ये केकचे मिश्रण घाला आणि वरून बदाम टाका.

केक प्रीहीटेड ओव्हनमध्ये ५५ मिनिटे बेक करा.

नंतर ओव्हनमधून केक काढा आणि वायर रॅकवर थंड होऊ द्या.

- Advertisment -

Manini