Lady Diana-डायना वर्जिन असल्यानेच प्रिन्सने केले तिच्याशी लग्न

Lady Diana-डायना वर्जिन असल्यानेच प्रिन्सने केले तिच्याशी लग्न

ब्रिटनचे नवे राजा असलेले चार्ल्स यांचा  6 मे रोजी राज्याभिषेक होणार आहे. 76 वर्षांचे चार्ल्स नेहमीच त्यांची आई महाराणी एलिजाबेथच्या सान्निध्यात लहानाचे मोठे झाले आहेत. आता तेच देशावर राज्य करत आहेत. आधी प्रिन्स आणि आता ब्रिटनचे किंग झालेल्या चार्ल्स यांच्या नावाची चर्चा जनतेतील कामापेक्षा त्यांच्या अफेयर्स आणि डायनाशी घटस्फोट याच मुद्द्यांवरून अधिक व्हायची होते . प्रिन्स चार्ल्स यांचे डायनावर कधीच प्रेम नव्हते.

चार्ल्स ६ मे ला ब्रिटनचे नवे राजा म्हणून  राजगादीवर विराजमान होणार आहेत.ब्रिटनच्या राजगादीवर बसणारे चार्ल्स हे पहीले घटस्फोटीत राजा ठरणार आहेत. प्रिन्सचे डायनावर कधीच प्रेम नव्हते. त्यामुळे डायना बऱ्याचेवळा एकटीच कार्यक्रमात दिसायची. एका मुलाखतीत डायनानेच सांगितले होते की चार्ल्सनी केवळ ती वर्जिन असल्याने आणि तिचा कोणीही बॉयफ्रेंड नसल्यानेच लग्न केले होते. जे राजपरिवारासाठी आवश्यक होते.

चार्ल्स आणि डायनाचे लग्न हे जगातील सर्वात मोठा जटील प्रश्न होता. सुरुतीपासूनच हे नाते तणावपूर्वक होते. द पॅलेस पेपर्सच्या लेखिका टीना ब्राऊन यांनी आपल्या पुस्तकातही लिहले आहे. वर्जिनिटीच्या परंपरेमुळेच हे लग्न झाले. पण हेच चार्ल्स आणि डायनाच्या आयुष्यातील तणावाचे कारण ठरले.

 

1981 मध्ये डायना आणि चार्ल्सचे लग्न झाले.राजघऱाण्याच्या नियमानुसार फक्त कुमारिकाचं ब्रिटनच्या राजघराण्याची सून बनू शकणार होती. डायनाचे 1980 साली डायनाच्या काकांनी डेली मेलला मुलाखत दिली. त्यावेळीही त्यांनी नववधू कोण यापेक्षा ती कुमारिका असणं राजेशाही परिवारात अधिक महत्वाचं आहे असं विधान केलं होते.

चार्ल्स यांचे प्रेम कॅमिलावर होते. पण त्यांनी तिच्याशी लग्न का केले नाही असा प्रश्न अनेकांना आजही पडतो. याचे उत्तर लेखिका टीना ब्राऊन हिने पुस्तकात दिले आहे. त्यानुसार कॅमिला आणि चार्ल्स यांचे लग्न होण्याचा संबंधच नव्हता. कारण कॅमिलाला हे चांगलच माहित होतं की शाही वधूसाठी वर्जिन असणं सगळ्यात जास्त महत्वाचं होतं.

जेव्हा डायनाला चार्ल्स आणि कॅमिला यांचे लग्नानंतरही प्रेमसंबंध सुरू आहेत हे कळालं तेव्हा ती शांत झाली. पण त्यानंतर तिला कॅमिलाची भीती वाटू लागली. डायनाने नंतर कॅमिलाला चार्ल्स आणि तिच्यात काहीच नातं नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतरही चार्ल्सने अनेकवेळा आपलं कॅमिलावरचं प्रेम कायम राहणार असल्याचं डायनाला स्पष्ट सांगितलं.

नंतर कॅमिला आणि डायना यांच्यात वादही झाला. त्यानंतर डायना सतत डिप्रेशनमध्ये राहू लागली. अखेर १९९२ साली चार्ल्स आणि डायना वेगवेगळे राहू लागले. १९९६ साली दोघांचा घटस्फोट झाला. डायनाने राजमहाल सोडला. पण दोन्ही मुलं राजघराण्यातील नियमामुसार चार्ल्सकडेच राहीली. त्यानंतर डायना सोशल वर्ककडे वळली. तर डायना यांचा मृत्यू 31 ऑगस्ट 1997 रोजी पॅरिस मध्ये रस्ते अपघातात  झाला.

डायनाच्या निधनानंतर 2005 मध्ये चार्ल्सने कॅमिलाबरोबर लग्न केलं.  आज डायनाच्या दोन्ही मुलांची लग्न झाली असून शाही परिवारातील जाचक नियमांना कंटाळून त्यांनीही राजमहाल सोडला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

First Published on: May 4, 2023 6:12 PM
Exit mobile version