Lipstick Type: क्रेयॉन ते क्रीम, लिपस्टीकचे प्रकार

Lipstick Type: क्रेयॉन ते क्रीम, लिपस्टीकचे प्रकार

महिलांच्या मेकअप किटमधील सगळ्यात महत्वाचं कॉस्मेटीक म्हणजे लिपस्टिक. कारण लिपस्टीकविना मेकअप पूर्ण होत नाही. यामुळे महिलांकडे लिपस्टिक कलेक्शन असतचं. पण बऱ्याचवेळा नक्की कोणती लिपस्टीक वापरायची ते अनेकींनी कळत नाही. पण आता मार्केटमध्ये लिपस्टिकच्या बऱ्याच शेड्स आणि प्रकार उपलब्ध झाले आहेत. पूर्वीच्या काळी फक्त साधी लिपस्टीक मिळायची. पण आता त्याला बरेच पर्याय असल्याने तुमच्या स्कीनटोन आणि आऊटफिटला मॅच होतील अशी लिपस्टीक निवडणंही सोपं झालं आहे.

क्रेयॉन लिपस्टिक

क्रेयॉन म्हणजे रंगीत खडू. पण आता लिपस्टिकही त्याच फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. लहान मुलं चित्र रंगवण्यासाठी जे क्रेयॉन्स रंग वापरतात तशीच लिपस्टीक आता सहज मिळते. क्रेयॉन लिपस्टीक कुठेही नेण्यास आणि वापरण्यास सोपी आहे. तसेच लाईटवेट असल्याने ती पर्समध्येही सहज राहते. क्रेयॉन लिपस्टीक ओठांना दीर्घकाळ ओलावा देण्याचे काम करते. त्यामुळे ओठ कोरडे पडत नाहीत. यामुळे महिलांमध्ये क्रेयॉन लिपस्टीकचे क्रेझ वाढत आहे.

पेन्सिल लिपस्टिक

पेन्सिल लिपस्टिक अगदी पेन्सिलसारखी दिसते. ते वापरण्यासाठी, प्रथम पेन्सिल लिपस्टिकच्या मदतीने ओठांवर एक रेषा तयार करावी. त्यानंतर तुम्ही लिपस्टिक म्हणूनही वापरू शकता. पेन्सिल लिपस्टीकचा वापर ओठांना बॉर्डर लाईन देण्यासाठी केला जातो. त्यामुळे लिपस्टीक पसरत नाही. ओठही रेखीव आणि आकर्षक दिसतात.

मॅट लिपस्टिक

अनेक मुलींना मॅट लिपस्टिक आवडते. कारण तो बराच काळ टिकतो. मात्र, हे लावण्यापूर्वी ओठांवर लिपबाम अवश्य लावावा. कारण असे न केल्यास तुमचे ओठ कोरडे होऊ लागतात.

क्रीम लिपस्टिक

क्रीम लिपस्टिक मॅट लिपस्टिक सारखी असते. फरक एवढाच आहे की तुम्ही ते लिप बाम न लावताही लावू शकता. त्याचा क्रीमी टेक्सचर तुम्हाला सुंदर लुक देतो.

ग्लॉसी लिपस्टिक

अनेक जणींची ग्लॉसी लिपस्टिक फॅवरेट असते. यात बऱ्याच शेड्स मिळतात. ग्लॉसी लिपस्टीक बराचवेळ ओठांवर राहते.

First Published on: May 4, 2024 5:36 PM
Exit mobile version