मुलींना वाढविताना मुलींमधील स्त्रीपण जपणे महत्वाचे

मुलींना वाढविताना मुलींमधील स्त्रीपण जपणे महत्वाचे

स्त्रिया आपले संपूर्ण आयुष्य कधी मुलगी म्हणू, कधी पत्नी तर कधी आई म्हणून समर्पित करतात. मग एके दिवशी कोणी येते अन म्हणत ‘तो’ या घरचा मुलगा आहे. संपूर्ण घराचा भार ती घेते म्हणून ती मुलगा. आपला समाज घर चालविण्यासाठी मुलगा हवा या मानसिकतेने ग्रासलेला आहे. यामध्ये त्या महिलांचाही समावेश आहे ज्यांनी हे जग नेहमी पुरुषांच्या नजरेतून पाहिलं आहे.

पालकांनी याची सुरुवात घरापासून करणे अत्यंत महत्वाचे आहे. मुलीला वाढविताना त्याचा अभिमान बाळगूनच वाढवायला हवे. तिच्यातील स्त्रीपण जपणे अत्यंत महत्वाचे आहे. आज आपण अशी 5 कारणे पाहणार आहोत, ज्याने त्यांना मुली म्हणूनच वाढविणे गरजेचे आहे.

ओळख राहण्यासाठी –

मुलींना वाढविताना मुलासारखे बनण्याची प्रेरणा देणे म्हणजे निसर्गाने दिलेल्या ओळखीशी छेडछाड करणे होय. अनेक वेळा मुलासारखं होण्याच्या हव्यसापोटी मुली आपलं मूळ विसरतात, आणि इथूनच मुलींच मानसिक अस्वस्थपणा सुरु होतो.

न्यूनगंडापासून संरक्षण करण्यासाठी –

एखाद्या मुलीला लहानपणापासून घर मुलासारख सांभाळावं लागत, असं वारंवार सांगितले जाते. अशाने मुलगी असल्याने तिच्यात न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. अशा भावना व्यक्तिशः कधीच दिसत नाही, त्यांना जवळून जाणून घेण्याची गरज असते.

नकारात्मक स्पर्धा टाळण्यासाठी –

आपण अशी अनेक उदाहरणे पाहतो, ज्यात मुलींमध्ये पुरुषांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात आणि त्यांच्याशी स्पर्धा सुरु होते. हे केवळ त्यांच्या वैयक्तिक विकासात अडथळा नाही तर समाजाकडे नकारात्मक दृष्टिकोन करण्यास देखील कारणीभूत आहे.

पुरुषांची श्रेष्ठता दाखवण्याचा अप्रत्यक्ष मार्ग –

मुलगा म्हणत अप्रत्यक्षपणे पुरुषांना चांगले आणि वरचे दाखविण्याचा प्रयन्त होतो.. शक्तीचे हे प्रदर्शन केवळ महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत नाही तर लिंगभेदाला प्रोत्सहन देते.

स्वातंत्र्य द्या –

महिलेला खरं तर, अभ्यासाचे स्वातंत्र्य, कमवण्याचे स्वातंत्र्य, मुलगी म्हणून जबाबदाऱ्या पार पडण्याचे स्वातंत्र्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे.

हा एक सापळा असू शकतो –

मुलींना घरचे सुपुत्र म्हणत तुमची त्यांच्या मनात घर चालवायला मुलगा हवा हे बिंबवत आहात हे आधी पालकांनी समजायला हवं. अशा प्रकारे पुरुषप्रधान समाजाला पुढे नेण्याचे काम करणाऱ्या महिलांमध्ये त्यांच्याही समावेश होईल. एकंदरच, पुरुषच सर्व काही करू शकतात या विचारसरणीला पुढे नेण्यासाठी सापळा विणला जात आहे असे म्हणणं वावगं ठरणार नाही.

 

First Published on: March 11, 2024 6:07 PM
Exit mobile version