तुमच्या मुलांना यशस्वी करायचंय! तर ‘या’ सवयी लावा

तुमच्या मुलांना यशस्वी करायचंय! तर ‘या’ सवयी लावा

आपली मुले भविष्यात यशस्वी व्हावी अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. आजकालची जीवनशैली आणि काळाची मागणी यामुळे ते आणखी महत्त्वाचे झाले आहे. मुलांमध्ये कोणत्या सवयी लावल्या पाहिजेत ज्यामुळे त्यांना भविष्यात यशस्वी होण्यास मदत होईल? मुलं मोठी झाल्यावर त्यांना काही गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांना आनंदी आणि यशस्वी बनवायचे असेल तर तुम्हाला त्यांच्यामध्ये योग्य सवयी लावाव्या लागतील. या सवयी एका रात्रीत लावल्या जाणार नाहीत, यासाठी मुलांना वेळ द्यावा लागेल.

ज्या सवयी मुलांना लावायच्या आहेत, त्या जर तुमच्याच अंगवळणी नसतील तर मुले त्या सवयी कशा फॉलो करणार ? त्यामुळे मुलांना या चांगल्या सवयी लावण्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्या आहेत त्या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देणे आवश्यक –
सर्व पालकांनी मुलांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावणे हे महत्वाचे असते. लहान मुलांच्या व्यक्तिमत्वाकडे कायम लक्ष दिले पाहिजे. लहान मुलांना आपण जे शिकवतो ते शिकण्याचा मुले प्रयत्न करत असतात. पालक कसे वागतात? आणि कसे बोलतात? हे सुद्धा महत्वाचे आहे.

वेळेचे महत्व-
लहान मुलांना वेळेचे आणि कामाचे नियोजन शिकवणे गरजेचे आहे. यामुळे त्यांची कोणतेही काम करतांना वेळेवर धावपळ होणार नाही.

सकारात्नक विचार-
मुल काय बोलत आहे. त्याचा विचार कोणत्या दिशेने सुरू आहे, हे तुम्हाला कळू शकेल. जर ते चुकीच्या दिशेने जात असतील तर तुम्ही त्यांचे विचार दुरुस्त करू शकता. तुम्ही कायम त्यांना सकारात्मक वागणूक दिली तर ते देखील सकारात्मक वागणे शिकू शकतील.

आत्ननिर्भर बनयला शिकवा-
मुलांना जर सतत तुमची सवय लागली तर मोठेपणी ते त्यांच्यासाठी खूप कठीण होऊ शकते. त्यामुळे त्यांना स्वत:ची कामं स्वत: करायला शिकवून आत्मनिर्भर करणे गरजेचे आहे. सुरूवातीपासूनच मुलांना काही गोष्टी समजावणे, शिकवणे गरजेचे आहे. भविष्यात त्याचा मोठा फायदा होतो. मुलांना स्वत:चे कपडे धुणे व इस्त्री करणे, स्वत:ची खोली आणि स्वत: च्या गोष्टी स्वच्छ व नीट ठेवणे, घरातील साहित्य आणणे या गोष्टी शिकवाव्यात.

जबाबदार व्हायला शिकवा-
लहान मुले निष्पाप असतात त्यांना जबाबदारी कशी पार पाडायची हे समजत नाही. अशा वेळी पालकांनीच लहान-सहान जबाबदाऱ्या देऊन त्यांना शहाणे करायची गरज असते. पालकांनी मुलांनी साफ- सफाई करणे, झाडांना पाणी घालणे, जेवण करण्यास मदत करणे. या अशा छोट्या-छोट्या गोष्टी त्यांना शिकवायला पाहिजेत.

सामाजिक कौशल्ये-
गोष्टी शेअर करणे, ऐकणे हे आणखी एक सामाजिक कौशल्य आहे. लोकांच्या भावना आणि विचार स्वीकारायला शिकवा, चांगले मॅनर्स शिकवा.थँक यू, सॉरी हे शब्द योग्य वापरण्याची चांगली पद्धत आपल्याला खूप मदत करू शकते.

मुलांच्या आरोग्याकडे लक्ष-
मुलांच्या आरोग्यासाठी योग्य आणि पोषक आहार देणे आवश्यक आहे. पालक या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देतात. पण, लहान मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी त्यांना अनेकदा बाहेरचे तळलेल, मसालेदार पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स दिले जातात. मात्र, हे पदार्थ मुलांचे नुकसान करू शकतात. अशा, अरबट-चरबट पदार्थांमुळे मुलांच्या प्रतिकारशक्तीवर तसेच, त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो.

 

First Published on: February 4, 2024 3:12 PM
Exit mobile version