Phubbing : नात्यात दुरावा आणणारे फबिंग

Phubbing : नात्यात दुरावा आणणारे फबिंग

फबिंग हि “फोन” आणि “स्नबिंग” वरून तयार केलेली संज्ञा आहे. एखाद्या व्यक्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे याचा अर्थ होतो स्नबिंग. एखादी व्यक्ती शारीरिकरित्या (फिजिकली) लोकांमध्ये उपस्थित असूनही मानसिकरीत्या (मेंटली) मात्र स्मार्टफोनसारख्या मोबाइल डिव्हाइसकडे अधिक लक्ष देऊन असते.

फबिंग म्हणजे काय?

‘फबिंग’ हा वर्तणुकीचाच एक असा प्रकार आहे ज्याचा आरोग्यावर आणि नात्यांवरही थेट परिणाम दिसून येत असल्यामुळं आता हा शब्द जरा गांभीर्यानं चर्चेत येताना दिसत आहे. फोन आणि स्नबिंग अशा दोन शब्दांना जोडून फबिंग हा शब्द तयार करण्यात आला आहे. तुमच्या समोर तुमचा जोडीदार, मित्र किंवा ओळखीतील एखादी व्यक्ती बसलेली असतानाही त्या व्यक्तीशी थेट संवाद साधण्याऐवजी जर तुम्ही मोबाईलमध्येच डोकावत असाल, स्क्रोल करत असाल तर त्या कृतीला फबिंग असं म्हटलं जात आहे.

फबिंगपासून सुटका कशी करावी?

फबिंग हे फोन सतत वापरण्याच्या व्यसनाचाच एक प्रकार असून, हा अतिरेक टाळण्यासाठी काही सोप्या कृती तुम्ही अवलंबात आणू शकता. जसं की…

फोनपासून दुरावा पत्करणं

कोणा व्यक्तीशी बोलताना, एखादी गोष्ट पाहताना, जेवताना फोन कायम दूर ठेवण्याची सवय स्वत:ला लावा. इथं तुम्ही स्वत:वर नेमकं किती नियंत्रण आहे याचं परीक्षणही करू शकता.

माइंडफुल स्मार्टफोन वापरण्याचा सराव करा

स्क्रीन वेळेवर मर्यादा सेट करून, अत्यावश्यक नसलेल्या सूचना म्युट करून आणि डिजिटल डायव्हर्जन पेक्षा वैयक्तिक परस्परसंवादांना प्राधान्य देऊन फक्त योग्य वेळीच स्मार्टफोन वापर करण्यास प्रोत्साहन द्या.

ऑफलाइन छंद जोपासणे

ऑफलाइन छंद आणि ॲक्टिव्हीटीजना प्रोत्साहन द्या.जसे की व्यायाम, वाचन किंवा इतर क्रीएटिव्ह कामात स्वतःला गुंतवणे.

‘फबिंग’ या मार्गांनी नातेसंबंधांना हानी पोहोचवते :

 भावनिक आसक्तीचा अभाव 

दिवसभर फोनवर असण्याच्या सवयीमुळे एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. जर संभाषण नसेल, तर हे उघड आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल अनेक गोष्टी कळणार नाहीत. एकटेपणा, निराशा आणि संतापाच्या भावना निर्माण होऊ लागतील.

 घनिष्ठतेमध्ये रस कमी झाला

नातेसंबंधात जवळीक खूप महत्त्वाची असते, मग ती शारीरिक असो वा भावनिक. याचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होतो. फबिंग हे भांडण आणि गैरसमजांचे कारण बनू शकते.

 संशय निर्माण करतो 

समोरासमोर बसून एकमेकांशी बोलण्याऐवजी फोन वापरत असाल तर साहजिकच संशय निर्माण होईल. जोडीदाराला स्वाभाविकपणे विचार करेल की त्याच्या किंवा तिच्यापेक्षा तुमच्यासाठी महत्त्वाचे असे काहीतरी आहे. तुम्ही फोनवर रील पाहात असाल किंवा गेम खेळत असलात तरी तुमच्या या सवयीमुळे भांडणे होतीलच.

First Published on: March 5, 2024 11:53 AM
Exit mobile version