ट्रेंडिंगवर असलेली स्टॅक डेटिंग नक्की आहे तरी काय?

ट्रेंडिंगवर असलेली स्टॅक डेटिंग नक्की आहे तरी काय?

मानव आपली लाइफस्टाइल दिवसेंदिवस झपाट्याने बदलत चालला आहे. आजच्या काळात लोक इतके व्यस्त आहेत की, त्यांना कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ घालवायचा नाही. सध्या सर्वत्र स्टॅक डेटिंग ट्रेडिंगवर आहे. हे सामान्य डेटिंगपेक्षा थोडे वेगळे आहे. मात्र, तरुणाईमध्ये याची लोकप्रियता अधिक दिसून येत आहे. ट्रेंडिंगवर असलेली स्टॅक डेटिंगचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत. नक्की काय ही ‘स्टॅक डेटिंग’ समजून घेऊयात,

स्टॅक डेटिंग काय आहे?

पूर्वी जेव्हा एखादी व्यक्ती डेटवर जायची तेव्हा त्यासाठी ती खूप तयारी करायची. या तयारीत अनेकांचे पैसेही खर्च व्हायचे आणि वेळी जायचा. मात्र बदलत्या काळानुसार आता असे होत नाही. तर स्टॅक डेटिंगमध्ये तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये कधीही तुम्ही एखाद्याला भेटू शकता. स्टॅक डेटिंग अर्थात यात फार तयारी किंवा दिखावा करण्याची गरज नसते.

उदाहरण घ्यायचे झाल्यास, जर तुम्ही कामावर जात असाल आणि तुमच्या पार्टनरचे ऑफिस तुम्हचय ऑफिसच्या जवळ असेल तर तुम्ही कॅबमध्ये स्टॅक डेटिंग करू शकता. तिथे एकमेकांना वेळ देऊ शकता किंवा संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना, कॅफेमध्ये थोडावेळ बसून आणि एकत्र कॉफी पिऊन स्टॅक डेटिंगचा आनंद घेऊ शकता. एकूणच, स्टॅक डेटिंग म्हणजे काय तर, जर तुम्ही व्यस्त असाल आणि तुमच्याकडे खार तारखेचे नियोजन नसेल तर तुम्ही एका दिवसात अनेक ठिकाणी लहान लहान डेट्सचे आयोजन करू शकता.

तरुणाईमध्ये का वाढतेय क्रेझ?

एका अहवालानुसार, डेटिंग अँप टिंडरवरील 32 टक्के तरुण स्टॅक डेटिंगसाठी त्यांच्या कामाच्या दिवशी एकमेकांना भेटत आहेत. एकंदरच, यावरून असे स्पष्ट होते की, तरुणांना आता डेट प्लॅन करण्यासाठी वेळ नाही, ते त्यांच्या कामात आणि डेली रुटीनमध्ये प्रेम शोधण्याचा प्रयन्त करत आहेत. अशा परिस्थितीत, स्टॅक डेटिंग ही संकल्पना खूप लोकप्रिय होत आहे.

पाश्चिमात्य देशांबरोबरच भारतासारख्या देशातही स्टॅक डेटिंगच ट्रेंड वाढत चालला आहे. खरे पाहता, ज्यांना त्यांच्या पार्टनरसोबत जास्त वेळ घालवायला आवडते त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. पण, कमी वेळात पार्टनर शोधायचा आहे किंवा डेली रुटीनसोबत पार्टनरला वेळ द्यायचा आहे, त्यांच्यासाठी स्टॅक डेटिंग बेस्ट ऑप्शन आहे.

 

 

 


हेही वाचा : Phubbing : नात्यात दुरावा आणणारे फबिंग

 

First Published on: March 12, 2024 3:56 PM
Exit mobile version