मुलं पालकांचं का ऐकत नाहीत? ही आहेत कारणे

मुलं पालकांचं का ऐकत नाहीत? ही आहेत कारणे

साधारणपणे सर्व पालकांना एकच समस्या असते की त्यांची मुलं आपलं अजिबात ऐकत नाहीत. एखादे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक वेळा बोलावे लागते. त्यानंतरही ते ऐकत नाहीत आणि पालकांशी वाद घालू लागतात. ही परिस्थिती पालकांना त्रास देते. पण पालकांनी कधी विचार केला आहे का की मुले त्यांचे ऐकत नाहीत याचे कारण काय आहे?

1. जेव्हा पालक वारंवार इशारे देतात

जर एकच गोष्ट तुम्ही मुलांना सतत बोलत असाल, त्यांना वारंवार खूप इशारे देत असाल तर मूल तुमचे ऐकणार नाही. इतकेच नाही तर वारंवार इशारे दिल्यानंतर तुमचे कधी ऐकायचे आणि कधी ऐकायचे नाही हेही मुलाला समजते.

2. जेव्हा पालक निरर्थक धमक्या देतात

‘तुमचे सामान आवरा, मी उचलणार नाही’, ‘खोली साफ करा नाहीतर बाहेर जायचं नाही’ किंवा ‘तुम्ही खेळणी उचलली नाहीत तर मी फेकून देईन’, अशा धमक्या प्रत्येक पालक कधी ना कधी मुलांना देतात. कारण मुलं पालकांच्या सूचना पाळत नाहीत. यामुळे पालक नाराज होतात आणि मुलांना इशारा वजा धमकीच देतात. त्यामुळे मूल घाबरून पुन्हा तसे वागणार नाही असा पालकांचा उद्देश असतो. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या याच धमक्या फक्त बोलण्यापुरत्या आहेत प्रत्यक्षात तुम्ही त्या कृतीत उतरवू शकत नाहीत. हे मुलांना कळतं त्यामुळे तुमच्या इशाऱ्यांकडे मूल दुलर्क्ष करतात.

 

3. मुलांशी वाद घालू नये
पालकांनी चुकूनही मुलाशी वाद घालू नये. लहान मुलांशी वाद घालणे योग्य नाही. पालक जितके जास्त वाद घालतील तितके मूल तुमचे ऐकणे बंद करेल. मुलाशी सत्तेची लढाई करण्याऐवजी, जर त्यांनी तुमची आज्ञा पाळली नाही तर काय होईल ते त्यांना सांगा.

 

4. पालक परिणामांचा विचार करत नाहीत
जेव्हा पालक मुलाचे हक्क हिसकावून घेतात तेव्हा मुलाशी भांडण्याऐवजी त्याच्याशी तार्किकपणे बोला जेणेकरून मूल काहीतरी शिकेल. मुलाला शिकवा की तो खरंच तुमच्या म्हणण्याप्रमाणे करेल.

5. जेव्हा पालक मोठ्याने बोलतात

जेव्हा मूल ऐकत नाही तेव्हा काही पालक त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलू लागतात. पण ओरडून काही फायदा होत नाही. यामुळे मूल तुमच्याकडे अधिक दुर्लक्ष करू लागेल. मारहाण किंवा शिवीगाळ करण्याप्रमाणे, मोठ्या आवाजात ओरडणे हे देखील पालकांचे मुलाशी असलेले नाते बिघडू शकते आणि भविष्यात मूल पालकांचे ऐकणार नाही.

First Published on: March 19, 2024 5:34 PM
Exit mobile version