तरुण-तरुणी मोठ्या वयाच्या स्त्री पुरुषांकडे का आकर्षित होतात?

तरुण-तरुणी मोठ्या वयाच्या स्त्री पुरुषांकडे का आकर्षित होतात?

हल्ली तरुण तरुणी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्री पुरुषांकडे आकर्षित होत आहेत. ही आश्चर्यकारक बाब नसून सामान्य गोष्ट झाली आहे. यामागे अनेक कारणे जरी असली तरी काही कारणे ही त्या त्या व्यक्तीच्या पूर्वायुष्याशी निश्चितच जोडलेली असतात.

सुरक्षिततेची भावना

अनेक वेळा तरुण मुलामुलींना त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसोबत सुरक्षित वाटते. जेव्हा एखादी मुलगी लहानपणापासून एकटी असते तेव्हा असे बरेचदा घडते. कुटुंबातील वडील किंवा भावासारख्या पुरुषाकडून संरक्षण न मिळाल्याने त्यांना अपमानाचा किंवा छेडछाडीचा सामना करावा लागला असेल, तर अशा मुलींना साहजिकच त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत सुरक्षित वाटते. मात्र जर समोरची व्यक्ती योग्य असेल तर चांगले अथवा चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने अनेकींचे आयुष्यही उद्धवस्त होते. असेच तरुणांच्याही बाबतीत अनेक वेळा घडताना दिसते.

 

परिस्थिती

काहीवेळा कामाच्या ठिकाणची परिस्थिती असा संपर्क साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अनेक कार्यालयांमध्ये फिल्डवर्क केले जाते. काम शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तरुण तरुणींना त्यांच्या वरिष्ठांसोबत कार्यालयाबाहेर जावे लागते. अननुभवी तरुण तरुणींना याचा फायदा होतो. हळूहळू हे तरुण संबंधित व्यक्तीच्या जवळ येतात. कामासाठी सतत एकत्र असताना अनेकवेळा मनंही भेटतात.

व्यक्तिमत्वाची छाप

कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा प्रभाव, व्यक्तिमत्व, स्थिती किंवा जीवनशैली देखील तरुणांना आकर्षित . तरुण मुलं मुली राजकारण आणि व्यवसायाशी निगडित अनेक व्यक्तिमत्त्वांच्या प्रेमात पडताना दिसतात. तथापि, हे आवश्यक नाही की असे नातेसंबंध नेहमीच वाईट असतात. अनेक वेळा अशी नाती यशस्वी होतानाही बघितली आहेत. ही परस्पर संबंध आणि परिपक्वतेची बाब आहे जिथे समज, विवेक आणि संयम आवश्यक आहे.

समजूतदारपणा

प्रामुख्याने कुठलेही नाते हे समजूतदारपणावर टिकते. यात वयाने मोठी असलेली व्यक्ती ही अनुभवातून घडलेली असते यामुळे मोठ्यांचा सहवास सुरक्षित असतो. तसेच कोणतीही परिस्थिती हाताळण्याच कौशल्य ज्येष्ठ व्यक्तींमध्ये असते. यामुळे तरुण व्यक्ती अशा व्यक्तींसमोर मन मोकळ सहज करतात. त्यातून भावबंध तयार होतात.

First Published on: March 27, 2024 2:47 PM
Exit mobile version