Vastu Tips : भिंतीवर पिंपळाचं झाड उगवलं तर दुर्लक्ष करू नका

Vastu Tips : भिंतीवर पिंपळाचं झाड उगवलं तर दुर्लक्ष करू नका

हिंदू धर्मात पिंपळाचे झाड (Pipal tree) अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. हे सर्वोत्कृष्ट वृक्ष मानले जाते, धार्मिक मान्यतेनुसार पीपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्ती आणि समृद्धी मिळते. वास्तुशास्त्रातही पिंपळाचे झाड खूप शुभ मानले जाते, परंतु घरात पिंपळाचे झाड किंवा रोप वाढवणे अशुभ आहे. जर हे झाड घराच्या कानाकोपऱ्यात वाढत असेल तर याचा अर्थ घरावर वास्तु दोषांचा प्रभाव पडतो. जर तुमच्या घरातही हे झाड वाढत असेल तर त्यावर ज्योतिषशास्त्रात उपाय सांगितले आहेत.

पिंपळाचे झाड कुठेही उगवते. घराच्या भिंतीत, छतावरही हे झाड उगवते. त्या झाडाचे काय करावे हे अनेकदा लोकांना माहिती नसतं. मात्र पिंपळाचे झाड घरात वाढवणे अशुभ असते. साधारणपणे सर्वांनी पाहिलेच असेल की घराच्या छतावर किंवा भिंतीच्या आधारावर अनेक वेळा पिंपळाचे झाड उगवते. मग या परिस्थितीत काय करावे हे लोकांना समजत नाही. जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड पुन्हा पुन्हा उगवत असेल तर त्यावर ज्योतिषशास्त्रात उपाय सांगितले आहेत. पिंपळाचे झाड घरात वाढू देऊ नये आणि ते वाढले तर ते काढून टाकावे.

घरात पिंपळाचे झाड असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नाही आणि त्यामुळे रोज नवनवीन समस्या निर्माण होतात. पिंपळाचे झाड तोडू नये, तसे करणे अशुभ मानले जाते, जर एखाद्या विशेष स्थितीत ते कापायचे असेल तर त्याची पूजा करून फक्त रविवारीच कापावे आणि इतर कोणत्याही दिवशी तोडू नये. रविवारी पिंपळाचे रोप काढण्यापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली लिंबू, मिरची आणि बाभळीचे काटे ठेवा. त्यानंतर पिंपळाचे रोप काढून टाकावे. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने पिंपळ पुन्हा परत येत नाही.

जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल तर त्या पिंपळाच्या झाडाची 45 दिवस पूजा करावी आणि त्याला कच्चे दूध अर्पण करत राहावे. त्यानंतर 45 दिवसांनी पिंपळाचे रोप त्याच्या मुळांसह इतर ठिकाणी लावा. असे केल्याने वास्तुदोष होणार नाहीत. वास्तुशास्त्रात पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदोष दूर होतो. यासोबतच सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते.

First Published on: March 15, 2024 4:37 PM
Exit mobile version