Fashion : स्लीव्हलेस ब्लाऊजच्या या लेटेस्ट डिझाईन्स करा ट्राय

Fashion : स्लीव्हलेस ब्लाऊजच्या या लेटेस्ट डिझाईन्स करा ट्राय

स्टायलिश आणि सुंदर लुकसाठी महिलांना साडी नेसणे आवडते. साडी हा असाच एक पोशाख आहे, जो तुम्ही प्रत्येक प्रसंगी घालू शकता. बहुतेक महिला स्टायलिश आणि ट्रेंडी साड्या खरेदी करतात. पण तुम्ही आता वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही स्लिव्हसेल ब्लाऊज (Sleeveless Blouse) डिझाईन्स नक्कीच वापरून पाहू शकता. कितीही पारंपरिक साड्या असल्या तरीही त्यावर स्टायलिश स्लिव्हलेस ब्लाऊज आकर्षक दिसतात. डीप नेक ब्लाऊजपासून ते अगदी हॉल्टर नेकलाईनपर्यंत सर्व स्टाईलचे स्लिव्हलेस ब्लाऊज हे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवर उठावदार दिसतात. अशा कोणत्या स्लिव्हलेस ब्लाऊजच्या डिझाईन्स वा स्टाईल्स आहेत, ज्या तुम्ही करू शकता.

व्ही-स्क्वेअर नेक ब्लाऊज

हे ब्लाउज डिझाइन आजकाल प्रत्येक फॅशन डिझायनरचे केंद्रबिंदू बनले आहे. तुम्ही साडी, लेहेंगा, शरारासोबत कॅरी करू शकता.

हायनेक स्लिव्हलेस ब्लाऊज

हायनेक गेल्या काही दिवसांपासून अधिक ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही ही स्टाईल केवळ तुमच्या टॉपसह नाही तर ब्लाऊजमध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही प्लेन साडीसह असा ब्लाऊज डिझाईन करत असाल तर कलर कॉन्स्ट्रास्ट करून तुम्ही नवा लुक देऊ शकता.

पाइपिंग ब्लाऊज

जर तुमची साडी दोन रंगाची असेल तर अशा प्रकारचा ब्लाउज बनवता येईल. एका रंगाचा ब्लाऊज आणि दुसऱ्या रंगाचा पाइपिंग ब्लाउजला आकर्षक लूक देता येईल.

ब्रॉड व्ही नेक ब्लाउज

या ब्लाउजचा लूक जरी साधा असला तरी तो घातल्याने जो आराम मिळतो तो टाईट आणि स्लीव्हलेस ब्लाउजमधून मिळू शकत नाही. हे कोणत्याही फॅब्रिकपासून बनविले जाऊ शकते.

श्रग स्टाईल ब्लाऊज

स्लीव्हलेस घालण्यात तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तर या प्रकारचा श्रग लूक स्लीव्हलेस ब्लाउज तुमच्या लेहेंग्यासह बनवता येईल. यासोबत दुपट्ट्याची गरज भासणार नाही.

ब्रॉड बोट नेक ब्लाऊज

ज्यांना जास्त शो आवडत नाही त्यांच्यासाठी हे स्लीव्हलेस ब्लाउज योग्य आहे. यात ब्रॉड स्लीव्हलेस डिझाईन आहे आणि ती साडी आणि लेहेंगा या दोन्हींसोबत परिधान केली जाऊ शकते. कोणत्याही प्रकारच्या साडीसाठी असा ब्लाऊज शिवू शकता.

फ्लोरल स्लिव्हलेस ब्लाऊज

तुम्हाला तुमच्या ब्लाऊजचा एलिगंट पण अत्यंत रिफ्रेशिंग लुक हवा असेल तर तुम्ही फ्लोरल स्लिव्हलेस ब्लाऊजचा विचार करावा. या स्टाईलिंगचे ब्लाऊज तुम्ही ऑफिसपासून ते पार्टीजपर्यंत सर्व ठिकाणी वापरू शकता.

____________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

First Published on: April 29, 2024 5:16 PM
Exit mobile version