Vastu Tips : घरात स्वस्तिक काढताना या गोष्टी लक्षात ठेवा

Vastu Tips : घरात स्वस्तिक काढताना या गोष्टी लक्षात ठेवा

कोणत्याही शुभ कामाची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजेने होते. गणेशाचे प्रतीक चिन्ह स्वस्तिक काढले जाते. मान्यतेनुसार स्वस्तिक काढल्याने कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. स्वस्तिक चिन्हाचा वापर केल्याने घरात सकारात्मकता, एकाग्रता, आनंद आणि समृद्धी येते. तसेच यामुळे कामात यश मिळते. म्हणूनच प्रत्येक कामाची सुरुवात स्वस्तिक चिन्ह लावून केली जाते. त्याचा उपयोग केल्याने अनेक प्रकारचे वास्तु दोष दूर करता येऊ शकतात. पण स्वस्तिक बनवताना केलेली लहानशी चूक महागात पडू शकते. त्यामुळे ते बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

काय आहे स्वस्तिक चिन्हाचा अर्थ

स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभप्रतीक आहे. स्वस्तिकचा सुचक अर्थ ‘कल्याण असो’ असा आहे. स्वस्तिक मध्ये सूर्य, इंद्र, वायु, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रम्हदेव, शिवपार्वती,श्रीगणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो. शांती,समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक.

स्वस्तिक काढताना या गोष्टी लक्षात ठेवा

घराच्या मुख्य दरवाजावर आणि घराच्या देव्हाऱ्यात स्वस्तिक काढल्यानं घरातील वास्तुदोष दूर होतात, असे वास्तू तज्ज्ञांचे मत आहे. स्वस्तिक बनवताना लक्षात ठेवा की रेषा एकमेकांना ओलांडत जायला नको. म्हणजे एक रेष ओढून त्यावरून दुसरी रेष काढू नये. हे शुभ मानले जात नाही. स्वस्तिक बनवताना मन शांत आणि स्थिर असायला हवं असं म्हणतात. स्वच्छ आणि निर्मळ मनाने केलेले कोणतेही काम यशस्वी होते हे लक्षात ठेवा. स्वस्तिकाच्या बांधणीतील त्रुटीमुळे सार्वजनिक रोग आणि अर्थाची हानी होते, असे जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा : Vastu Tips पलंगावर बसून अन्न का खाऊ नये?

______________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

First Published on: April 21, 2024 6:24 PM
Exit mobile version