Vastu Tips-घरामध्ये पाल दिसणे शुभ की अशुभ?

Vastu Tips-घरामध्ये पाल दिसणे शुभ की अशुभ?

घरात पाल दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यातही उन्हाळा किंवा पावसाळ्यात घराच्या भिंतींवर पाली दिसू लागतात. पण पाल एखाद्या पदार्थात पडल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो या भितीने आपण पालीला घराबाहेर काढतो. तसेच ती अंगावर पडल्यास अशुभ समजून आपण लगेच आंघोळ करतो. पण वास्तुशास्त्रानुसार, पाल शरीरावर पडणे शुभ आणि अशुभ दोन्हीचे संकेत देते. शास्त्रानुसार स्त्रीच्या डाव्या अंगावर आणि पुरुषाच्या उजव्या अंगावर पाल पडली तर ते शुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार, नवीन घरात किंवा घरात प्रवेश करताना पाल दिसली तर ते पूर्वजांचे आगमन सूचित करते. शास्त्रानुसार ते पालीच्या रूपात प्रकट होऊन आशीर्वाद देण्यासाठी येतात. पण जर तुम्ही नवीन घरात प्रवेश करत असाल आणि तुम्हाला मृत पाल दिसली तर ते अशुभ लक्षण आहे. यामुळे घर मालकाला आजारांना सामोरे जावे लागू शकते.

शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात पाल दिसली तर ते शुभ चिन्ह आहे. हे सूचित करते की तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. घराच्या मंदिरात पाल दिसल्याने घरात सुख-समृद्धी येते.

जर तुम्हाला स्वप्नात पाल पकडण्याचा तुम्ही प्रयत्न करताना दिसले आणि पाल घाबरून पळून जात असेल तर ते देखील शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळेल आणि तुम्हाला पैसेही मिळतील.

घरात दोन पाली आपापसात भांडताना दिसल्या तर ते अशुभ लक्षण मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, पालीचे आपापसात भांडणे कुटुंबातील सदस्यांमध्ये असमानता दर्शवते. त्यामुळे विनाकारण घरात भांडणे सुरू होतात. यासह, हे देखील सूचित करते की तुमचे नातेवाईक किंवा मित्रांशी मतभेद असू शकतात.

First Published on: May 1, 2024 1:32 PM
Exit mobile version