Vastu Tips पलंगावर बसून अन्न का खाऊ नये?

Vastu Tips पलंगावर बसून अन्न का खाऊ नये?

बऱ्याच घरात लहानच नाही तर मोठ्या व्यक्तींनाही सोफा किंवा बेडवर बसून जेवण करण्याची सवय असते. पण वास्तुशास्त्रानुसार बेडवर बसून जेवणे योग्य नसून त्यामुळे संबंधित व्यक्तीला जीवनात सातत्याने संकटांचा सामना करावा लागू शकतो. यात प्रमुख्याने अशा व्यक्तींचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्याच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते. याशिवाय या चुकीच्या सवयींमुळेही वास्तुदोष होतात.

बेडवर बसून अन्न खाल्ल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते.
व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
वास्तूनुसार अंथरुणावर बसून अन्न खाल्ल्याने घरात दारिद्र्य येते.
बेडवर बसून अन्न खाल्ल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि वास्तुदोषही निर्माण होतात.
अंथरुणावर बसून अन्न खाल्ल्याने राहूला अशुभ परिणाम मिळतात आणि घरात अशांतता निर्माण होते.
एवढेच नाही तर आई अन्नपूर्णा रागावू शकते.
त्यामुळे अंथरुणावर बसून चूकुनही जेवू नये.
नेहमी जमिनीवर बसून, पाय रोवून आरामात खावे.
रात्री जेवल्यानंतर खरगटी भांडी लगेच स्वच्छ करावीत.
कारण स्वयंपाकघर अस्वच्छ असल्यास माता अण्णपूर्णा क्रोधित होते.
टेबलवर बसूनही जेवण खाऊ शकता.
जेवतानाउत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे.

Edited By

Aarya joshi

First Published on: April 20, 2024 7:46 PM
Exit mobile version