महिलांनी वाढत्या वयासह तंदुरुस्त आणि सुंदर दिसण्यासाठी करा ‘ही’ योगासनं

महिलांनी वाढत्या वयासह तंदुरुस्त आणि सुंदर दिसण्यासाठी करा ‘ही’ योगासनं

चंदा मांडवकर :

योगाभ्यासामुळे आपले मन आणि शरिर तंदुरुस्त राहण्यासह महिलांना सुंदर दिसण्यास मदत होते. अशी काही योगासनं आहेत जी तुम्हाला वाढत्या वयासह तंदुरुस्त आणि सुंदर दिसण्यासाठी खुप फायदेशीर ठरतात. या व्यतिरिक्त दररोज योगासन केल्यास तुमचे वाढलेले वजन ही कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अशी काही योगासन आहेत ती महिलांनी दररोज केली पाहिजेत.

चक्रासन

वजन कमी करण्यासाठी तुम्ही चालण्यासाठी किंवा धावण्यासाठी जाता. परंतु घरच्या घरी वजन कमी करायचे असेल तर चक्रासन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हे योगासन केल्याने तुमच्या पोटाच्या आजूबाजूची चरबी कमी होण्यास मदत होते.

पश्चिमोत्तानासन

हे आसन करण्यासाठी तुम्हाला तुमचे दोन्ही पाय समोर परसवून बसायचे आहे. आता श्वास घेत तुमचे हात वरती करा आणि श्वास सोडत तुमचे हात पुढच्या बाजूस घेऊन जा. असे केल्यानंतर पायांची बोटे हाताने पकडण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करा की, तुमचे नाक हे गुडघ्याला टेकले पाहिजे. काही वेळे याच स्थितीत रहा आणि नंतर सामान्य स्थितीत या. सुरुवातीला तुमचे नाक गुडघ्या पर्यंत टेकणे किंवा पायांची बोट हाताने पकडण्यास समस्या येऊ शकते. परंतु नियमित पश्चिमोत्तानासन केल्यास ते शक्य होऊ शकते. हे आसन केल्याने पोटाची चरबी कमी होतेच. पण पाचक्रिया ही सुधारते.

भुजंगासन

हे आसन वाढत्या वयाच्या महिलांसाठी उत्तम आसन मानले जाते. यामुळे तुमच्या शरिराचा वरचा भागच खेचल्यासारखा वाटतो आणि चेहऱ्यावर ग्लो ही येतो.

तर भुजंगासन करण्यासाठी सर्वात प्रथम पोटावर झोपा. त्यानंतर आपले दोन्ही हात खांद्याच्या समान आणा आणि आपले तळवे जमिनीला टेकला. आता हळूहळू आपल्या शरिराचे वजन हातावर टाकत, हळूवार श्वास घेत आणि डोक वर करत मागच्या बाजूला थोड झुकण्याचा प्रयत्न करा.

हलासन

ज्या महिलांना पाठ, पोटाच आणि पायांची समस्या असते त्यांनी हसालन करावे. हे असान केल्याने पाठीच्या मसल्सला आणि मणक्याला मजबूती मिळते. ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते आणि पाचन क्रिया ही सुधारते.

हलासन करण्यासाठी सर्वात प्रथम मॅटवर पाठीवर झोपा. आता आपले हात शरिराजवळच ठेवा. असे केल्यानंतर पाय वरच्या बाजूस उचलत ते कंबरेपासून ९० डिग्री कोन तयार करेल असे ठेवा. यावेळी ओटीपात स्नायूंवर दबाब राहिल. पायांना डोक्याच्यावर जमिनीच्या दिशेने उचलाना पाय डोक्यामागे जातायत का हे पहा. या स्थितीत काही मिनिटे रहा. श्वासावर तुमचे लक्ष असू द्या.

पर्वतासन

हे आसन चाळीच्या वयातील महिलांनी दररोज केले पाहिजे. या आसनात तुमचे शरिर हे पर्वताप्रमाणे दिसते. त्यासाठी तुम्हाला सरळ ताठ उभे रहायचे आहे. आता हळूहळू तुमचे हात पुढील बाजूस झुकवत जमिनीला टेकवायचे आहेत. यावेळी लक्षात ठेवा तुमच्या पायाचे आणि हाताचे तळवे हे जमिनीला टेकले पाहिजेत.

पर्वतासनामुळे तुमचे ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते. तसेच शरिरात उर्जेचा प्रवाह होतो आणि अवयवयांना रक्ताचा पुरवठा सुरळीत होते. तसेच तुमच्या पोश्चरमध्ये सुधारणा होते. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम किंवा खुप वेळ बसून काम करत असाल तर हे आसन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे शरिराची स्ट्रेचिंग तर होतेच पण मणका सुद्धा लवचीक होण्यास मदत होते.

 


हेही वाचा :

महिलांनी फर्टिलिटीसाठी आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश

First Published on: January 24, 2023 5:49 PM
Exit mobile version