भिवंडीमध्ये सेक्सला नकार दिल्याने विवाहित महिलेची हत्या

भिवंडीमध्ये सेक्सला नकार दिल्याने विवाहित महिलेची हत्या

पनवेलमध्ये मतदारांना पैसे वाटणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक

एका २५ वर्षीय तरुणाने सेक्सला नकार दिल्याने विवाहित महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडी येथील शांती नगर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडीची शिक्षी सुनावली आहे. मृत विवाहित महिलेसोबत २५ वर्षीय तरुणाचे शारिरीक संबंध होते. आरोपी गेले काही दिवस सतत महिलेच्या घरी जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना चौकशी दरम्यान समजले होते. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सेक्सला नकार दिल्याने मी तिची हत्या केल्याची’ कबुली आरोपीने दिल्याचे शांती नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी सांगितले.

पोलिसांवर प्रश्नचिन्ह

गेल्या काही दिवसांमध्ये भिवंडीमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. या आधी देखील एक महिला एकटी असल्याचा गैरफायदा घेत घरात घुसून चोरट्याने गळा आवळून तिची हत्या करत घरातील लाखोंचा मुद्देमाल चोरल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीच्या कोनगाव भागात समोर आला होता. तर काही दिवसांपूर्वी एका १४ वर्षाय मुलाची अपहरणानंतर हत्या केल्याचे देखील समोर आले होते. त्यामुळे भिवंडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून या गुन्ह्यांचा लवकरात लवकर तपास करून गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

First Published on: February 10, 2019 6:54 PM
Exit mobile version