भिवंडी-वाडा रस्त्यावर खड्डयाने घेतला पहिला बळी; तरुणाचा जागीच मृत्यू

भिवंडी-वाडा रस्त्यावर खड्डयाने घेतला पहिला बळी; तरुणाचा जागीच मृत्यू

खड्डे

भिवंडी-वाडा महामार्गावर पावसामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र, हे खड्डे आता जीवघेणे ठरले असून भिवंडी-वाडा महामार्गावरील खडड्यांने पहिला बळी घेतला आहे. या खड्ड्यामुळे वाहनांच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू गेला आहे. तसेच वारंवार दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर येत आहेत.

नेमके काय घडल?

भिवंडी वाडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रात्री तरुण जात असताना खड्ड्यात गाडी आदळल्याने ती उडाली. त्यातच तरुणाचा ताबा सुटला अन् गाडी समोरच्या वाहनावर जाऊन आदळली. या दुर्घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. स्वप्नील जाधव असे २२ वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

स्वप्नील जाधव याचे मूळ गाव पिसेगाव असून तो शेलार इथे राहत होता. स्वप्नील जाधव कोपर येथील तेज कुरियर कंपनीत कामाला होता. रात्री कवाड येथील काम आटपून घरी येत असताना मुसळधार पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं. त्याचवेळी खड्डात दुचाकी आदळली आणि मागून येणाऱ्या वाहनानं जोरदार धडक दिल्यानं मोठा अपघात झाला असून या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, खड्ड्यामुळे नाहक बळी जात असल्याने रस्त्याचे काम पाहणाऱ्या टोल कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी पिसे गावचे सरपंच विजय पाटील यांनी केली आहे.


हेही वाचा – यंदा चौपाटीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी करावं लागणार Booking!


 

First Published on: July 30, 2020 1:43 PM
Exit mobile version