Mumbai Corona Update: आज १ हजार १०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: आज १ हजार १०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत आज १ हजार १०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबईत ३ लाख २९ हजार ८४३ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज ६५४ कोरोनाबाधित रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाख ७० हजार २७ इतकी झाली आहे. मुंबईत आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ हजार ४८७ इतकी झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९३ टक्के इतका आहे.

मुंबईत २५ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंतचा कोरोना वाढीचा दर हा ०.२९ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे आज ३ मार्च पर्यंत मुंबईत ३३ लाख ५३ हजार १२४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत १४ अँक्टिव्ह कटेंन्टमेन झोन आहेत. तर मुंबईत १८५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो कोविड लसीकरण सेंटरमध्ये जाऊन त्यांनी कोरोना लस घेतली.


हेही वाचा – Corona Vaccination: महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली कोरोनाची लस; जनतेला केली ‘ही’ विनंती

 

First Published on: March 4, 2021 7:49 PM
Exit mobile version