उरणफाटामध्ये कारमधून १० लाखाची रोकड जप्त

उरणफाटामध्ये कारमधून १० लाखाची रोकड जप्त

Income Tax Rules : आजपासून रोख पैसे काढण्याबरोबरच ठेवींसाठी पॅन, आधारची आवश्यकता

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पोलिसांची करडी नजर आहे. अशातच निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असताना नवी मुंबई येथील उरणफाटा येथे १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बेलापूर विधानसभा मतदार संघातील स्थायी दक्षता पथक क्रमांक ३ यांच्याकडून गुरुवारी उरणफाटा उड्डाणपुलाखाली तपासणी सुरू होती. या दरम्यान एका इर्टिगा गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये दहा लाख रुपये रोख रक्कम आढळून आली आहे. या रकमेबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आणि पुरावे सादर करू न शकल्याने सदर रक्कम सीबीडी पोलिसात जमा करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

First Published on: April 4, 2019 4:16 PM
Exit mobile version