सीएकडून व्यावसायिकाची ११ लाखांची फसवणूक

सीएकडून व्यावसायिकाची ११ लाखांची फसवणूक

सीएकडून व्यावसायिकाची ११ लाखांची फसवणूक

एका व्यावसायिकाने आयकर रिटर्न्स भरण्यासाठी महिला सीएला ११ लाख ३४ हजार दिले असता तिने ते पैसे न भरता त्याचा अपहार केला. याप्रकरणी सीएच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

अंबरनाथ (पूर्व) येथील वडवली सेक्शन या परिसरात अमित रमेश मुसळे (३३) हे व्यावसायिक राहतात. त्यांनी त्यांच्या बालाजी असोसिएट या कंपनीचे आयकर रिटर्न्स भरण्यासाठी ११ लाख ३४ हजार रुपये अंबरनाथच्या सीए (सनदी लेखापाल) नूतन मानेश्वर गोनहाली यांच्याकडे एका खाजगी बँकेतून ऑनलाईन आर.टी.जी.एसद्वारे विश्वासाने दिले होते. परंतु ही रक्कम नूतन यांनी आय टी रिटर्न्ससाठी न भरता त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला अशी तक्रार अमित यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली होती. या संदर्भात पोलिसांनी नूतन यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.


हेही वाचा – स्वस्त किराणाचे आमिष दाखवत २ लाखांना गंडा

हेही वाचा –  बॉलिवूड सोडून ‘ही’ अभिनेत्री बनली ‘पोकर प्लेअर’


 

First Published on: July 14, 2019 6:07 PM
Exit mobile version