DongriBuildingCollapse : ‘घटनेत १२ जाणांचा मृत्यू’

DongriBuildingCollapse : ‘घटनेत १२ जाणांचा मृत्यू’

मराठा आरक्षणाचा हेतू प्रामाणिक असल्यास काँग्रेस मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

मुंबईत पुन्हा एकदा इमारत कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंगरी परिसरातील कौसरबाग ही चार मजली इमारत कोसळली असून त्याच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ४५ जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर विरोधकांनी पुन्हा सरकार व पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यात १२ जाणांचा मृत्यू झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली आहे.

अग्निशमन दलाकडून बचावकार्य सध्या जोरात सुरू आहे. ही बिल्डींग असणारा भाग अतिशय चिंचोळा आहे.सरकार नक्कीच या सगळ्यांना मदत करेल. मी आता ही बिल्डींगबाबात सपूर्ण चौकशी करत आहे. तातडीने यावर उपाययोजना करावी लागणारी आहे. धोरणात्यमक निर्णय घेण्यात येईल. घटनास्थळी जलदगतीने उपचार पोहचवणे गरजेचे आहे. अशी माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली.

ही बिल्डींग म्हाडाच्या अखतारीत्य येते. ही इमारती बीएसटी नावाच्या डेव्हलपर कडे पुर्नविकासासाठी देण्यात आली होती. केवळ ही बिल्डींग नाही तर आजूबाजूच्या चार बिल्डींग बीएसटी नावाच्या डेव्हलपर कडे पुर्नविकासासाठी दिली होती. पण आता हे टेंडर देऊन किती वर्ष झाली? हे काम का झाले नाही याची लवकरच चौकशी होईल. त्या डेव्हलपरवर आणि म्हाडाचे जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. सध्या या ढिगाऱ्या खाली असणाऱ्यांना बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे. अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय समांत यांनी दिली.

First Published on: July 16, 2019 1:22 PM
Exit mobile version