ठाण्यात १२४ नवीन रूग्णांची नोंद : डोंबिवलीत तिघांचा मृत्यू!

ठाण्यात १२४ नवीन रूग्णांची नोंद : डोंबिवलीत तिघांचा मृत्यू!

ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी दिवसभरात १२४ रूग्णांची नोंद झाली तर ८० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय कल्याण-डोबिवली महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात सर्वाधिक ७१ नवीन रूग्णांची नोंद झाली असून डोंबिवलीतील तीन करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात करोनाबाधितांचा आकडा चार हजाराच्या उंबरठयावर येऊन ठेपला आहे तर केडीएमसीत रूग्णांची संख्या १३९९ वर पोहोचली आहे.

ठाण्यात वागळे प्रभाग क्षेत्रात सर्वाधिक २७ रूग्ण आढळून आले आहेत, त्याखालोखाल कळवा प्रभागात २५ रूग्ण, लोकमान्य सावरकर नगर २२ रूग्ण, नौपाडा कोपरी १७ रूग्ण, उथळसर प्रभागात ११ रूग्ण, मुंब्रा प्रभाग क्षेत्रात ८ रूग्ण, वर्तकनगर ७ रूग्ण तर माजीवडा मानपाडा प्रभागात ६ रूग्ण, आढळून आले. मात्र दिव्यात एकही रूग्ण सापडला नाही. ठाण्यात आतापर्यंत १७५० रूग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. हे प्रमाण ४७ टक्के आहे. सध्या ठाण्यात २०५६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

केडीएमसी महापालिका क्षेत्रात कल्याण पूर्वेत सर्वाधिक २४ रूग्णांची नोंद झाली आहे. कल्याण पश्चिमेत १५ रूग्ण, डोंबिवली पश्चिमेत १२ रूग्ण, डोंबिवली पूर्वेत १३ रूग्ण तर मांडा- टिटवाळयात ५ रूग्णांचा समावेश आहे. डोंबिवली पश्चिमेतील ७२ वर्षीय आणि ७३ वर्षीय दोन रूग्ण आणि पूर्वेतील ६० वर्षीय एक रूग्ण अशा तीन रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ३७ वर पोहचली आहे. आतापर्यंत ६६२ रूग्ण हे उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत तर ६९८ रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहे.

First Published on: June 6, 2020 8:17 PM
Exit mobile version