देवनार डम्पिंग ग्राउंडवरील झोपड्यांचा विळखा सुटला, १२७ झोपड्या जमीनदोस्त

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील झोपड्यांचा विळखा सुटला, १२७ झोपड्या जमीनदोस्त

Dumping Ground

देवनार डम्पिंग ग्राऊंडला विळखा घातलेल्या झोपड्या बुधवारी हटवण्यात आल्या. संरक्षक भिंतीच्या आड या झोपड्या येत होत्या. एकूण १२७ झोपड्या एम पूर्व विभागाने जमीनदोस्त केल्या. महापालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागात देवनार डम्पिंग ग्राऊंडची भिंत बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या भिंतीच्या बांधकामात १२७ अनधिकृत झोपड्या अडथळा ठरत होत्या. देवनार क्षेपणभूमीलगत आणि आदर्श नगर नाल्याजवळील झोपड्या मंगळवारी उशीरापर्यंत करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीसांच्या विशेष सहकार्याने करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची माहिती ‘एम पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली.

भिंतीशेजारील झोपड्या तोडण्यात आल्या.

महापालिकेच्या परिमंडळ – ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘एम पूर्व’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान शिवाजीनगर, गोवंडी परिसरातील आदर्शनगर नाल्याजवळ उद्भवलेल्या अनधिकृत झोपड्या १२७ झोपड्या आता हटविण्यात आल्या आहेत. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे ३० कामगार – कर्मचारी -अधिकारी सहभागी झाले होते. तसेच या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलातील ५२ पोलीस कर्मचारी – अधिकारी यांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. मुंबई पोलीसांच्या मदतीने यशस्वीपणे करण्यात आलेल्या या पाडकाम कारवाई दरम्यान १ जेसीबी, १ डंपर यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामुग्री देखील वापरण्यात आली, अशीही माहिती किलजे यांनी दिली आहे.

First Published on: December 19, 2018 1:32 PM
Exit mobile version