बारावीच्या विद्यार्थिनीवर तोतया पोलिसांचा बलात्कार; डोंबिवली-ठाकुर्लीदरम्यानची धक्कादाय घटना

बारावीच्या विद्यार्थिनीवर तोतया पोलिसांचा बलात्कार; डोंबिवली-ठाकुर्लीदरम्यानची धक्कादाय घटना

धक्कादायक! NEETला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; चार विद्यार्थ्यांना अटक

डोंबिवली-ठाकुर्लीदरम्यानच्या खाडीकिनारा परिसरात भरदिवसा बारावीत शिकणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन तोतया पोलिसांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे. परंतु या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (12th student girl raped by fake police Shocking incident between Dombivli-Thakurli)

शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या एका मित्रासोबत ठाकुर्ली खाडीकिनारा परिसरात फिरायला गेली होती. दोघे रेल्वेच्या बंद असलेल्या पंप हाऊसजवळ फिरत असताना दोन अनोळखी तरुण त्या ठिकाणी आले. त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राला पोलीस असल्याचे सांगितले. तुम्ही या ठिकाणी आलात याबद्दल तुमच्या पालकांना कळविले जाणार असल्याचे सांगितले. त्यापैकी एक जण पीडित तरुणीला घेऊन काही अंतरावर गेला, तर दुसरा आरोपी तरुणीच्या मित्राला घेऊन स्थानक परिसरात आला.

त्याने आमचे साहेब या ठिकाणी बसले आहेत, तू चल त्यांच्याशी बोल, असे त्या तरुणाला सांगितले. यादरम्यान पहिल्या आरोपीने मुलीवर बलात्कार केला. नंतर दुसरा आरोपी मुलीच्या मित्राला सोडून पुन्हा त्या ठिकाणी आला आणि त्यानेदेखील मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर दोघेही आरोपी तिथून निघून गेले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

First Published on: January 29, 2023 6:30 AM
Exit mobile version