Fake Alert: ‘१४० नंबरचा कॉल उचलू नका’, हा मेसेज फॉरवर्ड करत असाल तर तुम्ही गंडलायत

Fake Alert: ‘१४० नंबरचा कॉल उचलू नका’, हा मेसेज फॉरवर्ड करत असाल तर तुम्ही गंडलायत

व्हॉट्सअपवर व्हायरल झालेला मेसेज आणि व्हिडिओ

मुंबई पोलिसांचा व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडीओने मुंबईकरांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस नागरिकांना सायबर गुन्हेगाराबाबत जनजागृती करीत “१४० किंवा ४० या क्रमाकांवरुन सुरू होणारे कॉल घेऊ नका. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते”, असे या व्हिडिओमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल मेगा माईक वरून घोषणा करताना दिसतो. हा व्हिडिओ आणि त्याच सोबत व्हायरल झालेल्या मेसेजने मुंबईसह उपनगरात गोंधळाचे वातावरण पसरले होते. मात्र हा व्हिडिओ आणि मॅसेजमुळे लोकं पॅनिक झाल्यामुळे अखेर याची गंभीर दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतली आहे.

एका मनोरंजन वाहिनेने आपल्या नवीन येणाऱ्या एका सिरीयलच्या प्रमोशन करण्यासाठी +१४० या नंबर वरुन कॉल केल्याचे कळते. त्यानंतर याच नंबरपासून सावधान रहा, असा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओची दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतली आहे. दरम्यान महाराष्ट्र सायबर सेलच्या ट्वटिर अकाऊंटवर आताच एक ट्विट आले आहे. ज्यामध्ये त्यांनी +१४० नंबर वरुन येणारे कॉल उचलू नका, असे आवाहन केले. मात्र पोलिसांचा व्हिडिओ खरा आहे की खोटा? याबाबत कोणतीही वाच्यता केली नाही.

तसेच एका मनोरंजन वाहिनीने सुरु केलेल्या प्रमोशनल Activity वर पोलिसांनी टीका केली आहे. तसेच या चॅनेलला हे प्रमोशन तात्काळ थांबवावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

मात्र जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यावर आता अनेक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. खरंच पोलिसांनी वायरलेस व्हॅन वापरुन हे व्हिडिओ तयार केले का? मग ते मुंबईतील काही निवडक भागातच का केले? ते संपुर्ण मुंबई किंवा राज्यातील इतर भागात का नाही केले? असे अनेक प्रश्न आता सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

तर ज्या वाहिनीने कॉल केले होते, त्यांनाही ट्विटरवर काहींनी स्पष्ट भाषेत जाब विचारल्यानंतर वाहिनीने आपली चूक कबूल केली असून दिलगीरी व्यक्त केली आहे.

मनोरंजन वाहिनीचा खुलासा

सध्या कोरोनाचे संकट असताना व्हॉट्सअपवर अशा प्रकारचे मेसेज जाणिवपूर्वक व्हायरल करणे चुकीचे आहे. लोकांमध्ये आधीचे भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या नावाने असे व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन सत्यता बाहेर आणावी, अशीही मागणी होत आहे.

First Published on: July 10, 2020 11:59 PM
Exit mobile version