CoronaVirus – धारावीत कोरोनाचे १५ तर दादरमध्ये २ नवीन रूग्ण!

CoronaVirus – धारावीत कोरोनाचे १५ तर दादरमध्ये २ नवीन रूग्ण!

धारावीत तपासणी करताना आरोग्य कर्मचारी

मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. धारावीत कोरोनाचे १५ नवीन रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे धारावीत कोरोनाची रूग्णांची संख्या ४३ वर पोहचली आहे. तर धारावीबरोबरच दादर परिसरात कोरोनाची २ नवीन रूग्ण सापाडले आहेत. या आधी माहिममध्ये २ रूग्ण सापडले होते. दादरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ वर पोहचली आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. धारावीत दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान वाढलं आहे.

धारावीत सापडलेल्या १५ नव्या कोरोना रुग्णांपैकी ९जण हे राजीव गांधी क्वॉरंटाइन केंद्रातील आहेत. तिथे या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. हे नऊ जण धारावीतील रहिवासी आहेत. ते धारावीतील सोशल नगरमध्ये मृत्यू पावलेल्या मृत व्यक्तीच्या आणि मदिना नगरमधील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते.

धारावीत १५ नवीन रूग्ण

धारावीत आज १५ नवीन रूग्ण सापडले आहेत. यातील ९ रूग्णांना राजीव गांधी कॉम्प्लेक्समध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दलीगा नगर – ५ रूग्ण

वैभव सोसायटी – २ रूग्ण

मुकुंद नगर – ९ रूग्ण

मदीना नगर – २

धनवाडा चाळ – १

मुस्लीम नगर – ५

सोशल नगर – ६

जनता सोसायटी – ४

कल्याणवाडी – २

पीएमजीपी कॉलनी – १

दादरमध्ये कोरोनाग्रस्तांची आकडा वाढता

दादरमध्ये आज नवे रूग्ण सापडले आहेत. कामगार स्टेडियमजवळी आंबेडकर नगरमध्ये एका ५२ वर्षीय महिलेला आणि कासारवाडी येथील पालिका कर्मचारी वसाहतीतील ४८ वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही विभाग सील करण्यात आले आहेत. दादरमध्ये दोन नवे कोरोना रुग्ण सापडल्याने येथील कोरोना रुग्णांची संख्या १३वर गेली आहे.

First Published on: April 12, 2020 10:34 AM
Exit mobile version