Coronavirus In Maharashtra: राज्यात १६ हजार ८६७ नवे रुग्ण; तर ३२८ जणांचा मृत्यू

Coronavirus In Maharashtra: राज्यात १६ हजार ८६७ नवे रुग्ण; तर ३२८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात १६,८६७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७,६४,२८१ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण १,८५,१३१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २४ हजार १०३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१५ % एवढा आहे.

राज्यात आज ३२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३१, ठाणे २०, नवी मुंबई ९, मीरा भाईंदर ९, रायगड २१, नाशिक १६, जळगाव २०, पुणे ४३, पिंपरी चिंचवड मनपा ४, सोलापूर ९, सातारा ६, कोल्हापूर १५, सांगली २३, औरंगाबाद ३, नागपूर ३१ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३२८ मृत्यूंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू हे ठाणे १४, पालघर ४, नाशिक ३, औरंगाबाद २, कोल्हापूर २, लातूर २, नागपूर २, सांगली २, बीड १, जळगाव १,पुणे १, रत्नागिरी १ आणि सातारा १ असे आहेत. आज ११,५४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५,५४,७११ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४०,१०,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,६४,२८१ (१९.०५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,१२,०५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,५२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा –

पालिकेचा शिक्षकांवर अविश्वास; तांदुळ, वह्या वाटप ऑनलाईन लाईव्ह दाखवण्याचे आदेश

First Published on: August 29, 2020 8:50 PM
Exit mobile version