Mumbai Corona Update: दिलासादायक! आतापर्यंत १ लाख ७९ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात

Mumbai Corona Update: दिलासादायक! आतापर्यंत १ लाख ७९ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ८१३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १५ हजार ४६५ वर पोहचली आहे. तर ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार १५२ वर पोहचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज ३ हजार ५०२ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ७९ हजार ५१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये आज १ हजार ८१३ नवे रुग्ण सापडले असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३५ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३१ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३९ जण हे ६० वर्षांवरील, तर ७ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे २४ हजार १९९ रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. तर २४ तासात ३५०२ कोरोना रूग्ण बरे झाले आहे. दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८३% आहे. आतापर्यंत ११ लाख ७८ हजार १११ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.


राज्यात १०,२४४ नवे रुग्ण, २६३ जणांचा मृत्यू

First Published on: October 5, 2020 9:52 PM
Exit mobile version