मॉडेलच्या हत्येप्रकरणी मित्राला अटक

मॉडेलच्या हत्येप्रकरणी मित्राला अटक

मॉडेल मानसी दीक्षित

मानसी दीक्षित या मॉडेलच्या हत्येप्रकरणी २० वर्षीय तरुणाला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली आहे. मुझ्झमिल सय्यद असे या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपीने मानसीची हत्याकरुन तिचा मृतदेह मालाडच्या माइन्डस्पेस परिसरात फेकला होता. सोमावारी सायंकाळी एका सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर मयत मुलीचे नाव मानसी दीक्षित असल्याची माहिती समोर आली. तिच्या मित्रानेच हा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मानसीचे इन्स्टाग्राम अकाऊंट

मागील काही दिवसांपासून सुरु होते वाद

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी मुझ्झमिल आणि मानसी हे दोघे मुंबईत अंधेरीत परिसरात राहात होते. मुझ्झमिल हा मूळ हैद्राबादचा रहिवासी आहे. मानसी मुंबईला मॉडलिंग करण्यासाठी आली होती तर मुझ्झमिल हा शिकण्यासाठी आला होता. मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरु होते. सोमवारी दुपारी दोघांमध्ये झालेल्या वादात मुझ्झमिलने मानसीच्या डोक्यावर हत्याराने जोरदार वार केले. मानसी ओरडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने तिचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर मृतदेहाचा विल्हेवाट कसा लावावा याबद्दल त्याने विचार केला. आपल्या जवळील एका सुटकेसमध्ये त्याने मृतदेह टाकला. ही बँग मालाड परिसरात नेऊन फेकली.

First Published on: October 16, 2018 8:36 AM
Exit mobile version