२०१९ ची निवडणूक देशाची दिशा ठरवणार – सचिन सावंत

२०१९ ची निवडणूक देशाची दिशा ठरवणार – सचिन सावंत

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न, सचिन सावंत यांचा घणाघात

२०१९ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांची एकमेकांवर टोलेबाजी आणि आरोपप्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरु असतानाच पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची जबाबदारी त्या त्या पक्षातील प्रवक्त्यांवर येते. देशातील सर्वात जुना आणि महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस. एका ठराविक विचारधारेतून लोकांसमोर येणाऱ्या या पक्षाने सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा मान मिळवला आहे. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसला जनतेनं नाकारलं. आता पुन्हा एकदा मोदीविरोधी मोट बांधण्यासाठी महाआघाडीचं शस्त्र हाती घेतलेल्या काँग्रेसची राजकीय महत्त्वाकांक्षा माय महानगरच्या खुल्लमखुल्ला या फेसबुक लाईव्हमधून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मांडली आहे.

२०१९ ची लढाई गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर ६७ वर्षांचा हा निवडणुकांचा प्रवास आहे. पण या आधीच्या निवडणुकांसारखी ही निवडणूक नाही. २०१९ ची निवडणूक ही देशाची दिशा स्पष्ट करणारी निवडणूक आहे. कुठल्या दिशेला हा देश जाणार आहे. आज देशासमोर जे संकट आहे, ते या देशातील जनता ओळखेल की नाही, हे समजणारी ही निवडणूक आहे. या देशात जे फॅसेस फोर्सेस, कम्युनल फोर्सेस, धर्मांद शक्तींचा प्रवाह वाढत चालला आहे. द्वेष वाढत चालला आहे. आपलं राष्टप्रेम सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याचा द्वेष करणं, त्याची गरज लागलेली आहे. त्यामुळे या देशामध्ये आलेली विषमता, ती दूर करण्यासाठी लागलेली प्रक्रिया ही संपूर्णपणे संकटात आलेली आहे. या देशातील लोकशाही, संविधानात्मक विचार हा संपूर्णपणे संकटात असताना आणि गेल्या पाच वर्षात जो काही धोका निर्माण झाला आहे, ते चित्र समोर असतानाही त्यांना पुन्हा संधी द्यायची का पुन्हा संविधानिक पद्धतीने लोकशाहीला धरून धर्मनिरपेक्षता प्रस्थापित करण्याकरता या ठरण्यासाठी ही निवडणूत दिशा ठरवणारी असणार आहे. त्यामुळे सर्वांची एकत्र मोट बांधून ही लढाई लढण्यासाठी ५६ पक्ष एकत्र आलो आहोत. हा आकडा वाढेलही. निश्चितपणे ही महाआघाडी एका विचारधारेने जोडलेली आहे. देश चालवण्यासाठी ५६ इंचाच्या छातीची नाही तर कणखर हृदयाची आवश्यकता आहे.

सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा – 

 

First Published on: March 25, 2019 9:38 PM
Exit mobile version