कोरोनामुळे पालिकेच्या २२० कर्मचाऱ्यांचा मृत्यू, आतापर्यंत फक्त ९६ मृतांच्या नातेवाईकांना विमा कवच

कोरोनामुळे पालिकेच्या २२० कर्मचाऱ्यांचा मृत्यू, आतापर्यंत फक्त ९६ मृतांच्या नातेवाईकांना विमा कवच

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आपले कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई महापालिकेच्या २२० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यापैकी फक्त ९६ मृत कर्मचार्यांच्या नातेवाईकांनाच ५० लाख रुपयांच्या विमा कवचाचा लाभ मिळाला आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी मध्यंतरी १००% कर्मचारी उपस्थितीबाबत आदेश काढले होते. मात्र त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना सेवेत असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांना नकळत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यात अनेक कर्मचारी, अधिकारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही कर्मचारी,अधिकारी हे सफाई खाते, आरोग्य खाते,रस्ते विभाग आदी खात्यात कार्यरत कर्मचारी, अधिकारी अशा २२० कर्मचारी, अधिकारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे; मात्र आतापर्यंत ५० लाख रुपयांचे विमा कवच केवळ ९६ मृत कर्मचारी,अधिकारी यांच्या नातेवाईकांना मिळाले आहे. मात्र उर्वरित मृतांना विमा कवच देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या कामगार अधिकाऱ्याने दिली आहे.

विमा कवचाबाबत संभ्रम

मात्र आता ज्या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर असताना कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशाच कर्मचाऱ्यांच्या वारसास ५० लाखाचे विमा कवच दिले जाणार असल्याची चर्चा पालिकेत आहे. त्यामुळे  इतर खात्यातील कर्मचाऱ्यांचा जर कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांच्या विमा कवचाचा लाभ दिला जाणार की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

ज्या २२० पालिका कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यापैकी १४७ प्रकरणे केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली होती. त्यापैकी केवळ १९ प्रकरणे केंद्राने मंजूर केली. १२८ प्रकरणे नामंजूर केल्याची माहितीही कामगार विभागाने दिली आहे.त्या १२८ प्रकरणातील ७७ मृत कामगारांच्या वारसांना विमा कवच दिल्याची महितीही त्यांनी दिली. त्यामुळे आतापर्यंत केवळ ९६ वारसांनाच अद्याप विमा कवच मिळाले आहे.उर्वरीत प्रकरणांची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही कामगार विभागाने दिली आहे.

First Published on: June 1, 2021 7:22 PM
Exit mobile version