Mumbai Corona: आज दिवसभरात २ हजारांहून अधिकांना कोरोनाची बाधा; ४८ जणांचा बळी

Mumbai Corona: आज दिवसभरात २ हजारांहून अधिकांना कोरोनाची बाधा; ४८ जणांचा बळी

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून आज १०,५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,५४,३८९ झाली आहे. राज्यात १,९६,२८८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर मुंबईत आज कोरोनाचे २ हजार २११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३४ हजार ६०६ वर पोहचली आहे. तर ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ५५२ वर पोहचला आहे.

दरम्यान चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २० हजार ७९० Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज ३ हजार ३७० रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण २ लाख १ हजार ४९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये आज २ हजार २२१ नवे रुग्ण सापडले असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४४ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २९ रूग्ण पुरुष तर १९ रूग्ण महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३५ जण हे ६० वर्षांवरील, तर ११ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. तर दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८५% आहे.


राज्यात १०,५५२ नवे रुग्ण, १५८ जणांचा मृत्यू

First Published on: October 14, 2020 9:13 PM
Exit mobile version