अंबरनाथमध्ये ३ कोरोना बाधित रुग्ण बेपत्ता!  

अंबरनाथमध्ये ३ कोरोना बाधित रुग्ण बेपत्ता!  
कोरोना मुक्त रुग्ण शहराची घोषणा करणाऱ्या अंबरनाथ पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असून मंगळवारी जाहीर केलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या यादीतील तीन रुग्ण त्यांच्या पत्यावर बेपत्ता असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या तीन रुग्णाकडून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत असून या वाढत्या ‘कोरोना कहर’बाबत नगरपालिका अधिकारी आणि नोडल अधिकारी एकमेकांवर जबाबदारी झटकत असल्याचे समोर आले आहे.
एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णमुक्त अंबरनाथ घोषणा करणारे पालिका प्रशासन चक्क तोंडघशी पडले असून शहरातील आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाचा ताळमेळ बिघडत चालल्याने कोरोना बाधित  रुग्णाना उपचाराची ‘छाया’ दुरावस्थेत वेळेवर उपचार अभावी  मोठी हेळसांड होत असल्याने कोरोनाचा कहर वाढत होऊ लागला आहे.
बुधवारी नवीन २२ बधितांसह  कोरोना संसर्ग बधितांची संख्या ४५९ वर पोहोचली आहे.तर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील बेपत्ता झालेले हे तीन रुग्ण सिद्धार्थनगर, शिवनगर भागातील असून त्यांचा कोरोना अहवाल आल्यानंतर पालिकेने त्यांचा शोध घेण्यास प्रयत्न केला मात्र ते आढळून आले नाहीत.त्यामुळे पालिका प्रशासनाने थेट त्यांची नावे, मोबाईल नंबर जाहीर केले आहेत त्यांच्या संपर्कातील इतरांना माहिती मिळेल या दृष्टीने ही नावे जाहीर केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले .या रुग्णाबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ नगरपालिकेशी संपर्क करण्याचे आवाहन मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांनी केले आहे.
First Published on: June 11, 2020 9:00 PM
Exit mobile version