अमूल कंपनीच्या नावाने ३ लाखांची फसवणूक

अमूल कंपनीच्या नावाने ३ लाखांची फसवणूक

अमूल कंपनी

अमूल इंडिया या कंपनीची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून उल्हासनगरमध्ये एकाला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. अमूलची एजन्सी देतो असे सांगत जवळपास ३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

उल्हासनगर – ४ येथील कुर्ला कॅम्प परिसरात कालीमाता मंदिराजवळ, अरुण जगन्नाथ डोळस ( ४२ ) हे राहतात. काही महिन्यांपूर्वी डोळस यांना राजकुमार नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधून अमूल इंडिया कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने या कंपनीची एजन्सी हवी असल्यास आमच्याशी संपर्क करा असेही सांगितले होते. राजकुमाराच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन डोळस यांनी एजन्सी मिळविण्याची इच्छा व्यक्त केली.

आरोपीने अरुण डोळस यांना ऍक्सिस बँकेत ३ लाख रुपये भरण्यास सांगितले. डोळासने ही रक्कम भरल्यानंतर बऱ्याच दिवसांचा कालावधी झाला. परंतू त्याला एजन्सी मिळाली नाही. त्यांनी आरोपी राजकुमार याला वारंवार फोन देखील लावला. मात्र त्याचा फोन लागला नाही. याप्रकरणी अमूल कंपनीमध्ये चौकशी केली असता राजकुमार नावाचा कोणीही व्यक्ती तेथे कामाला नसल्याचे सांगण्यात आले. चिंतेत आलेल्या अरुण डोळास यांनी थेट विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी राजकुमारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

First Published on: March 14, 2019 8:39 PM
Exit mobile version