लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या समुद्री घोड्यांची तस्करी; ३० किलो साठा जप्त

लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या समुद्री घोड्यांची तस्करी; ३० किलो साठा जप्त

वाळलेल्या समुद्री घोड्यांची तस्करी, ३० किलोचा साठा जप्त

मुंबई विमानतळावरून ३० किलो सुकवलेल्या समुद्री घोड्यांची तस्करी उघड झाली आहे. वनविभागाच्या कांदळवन संरक्षण विभागाने कारवाई करत हा माल जप्त केला. तस्करी करणारे आरोपी हे सुकवलेले समुद्री घोडे मलेशियाला घेऊन जात असल्याची माहिती मिळत आहे. सुकविलेल्या समुद्री घोड्याचे सूप प्यायल्याने लैंगिक शक्ती वाढते अशी धारणा सिंगापूर, चीन, जपान या देशांमध्ये असल्याने भारतातून त्यांची तस्करी होत असल्याची माहिती वन्यजीव तस्करीचे अभ्यासक विजय अवसरे यांनी दिली.

शार्क माशांच्या विविध अवयवांची तस्करी ही परदेशात सूप, सौंदर्य प्रसाधने, तेल, कपडे बनविण्यासाठी होते. तर घरामध्ये समुद्री प्रवाळ लावल्याने कुटुंबाची प्रगती होते, अशा अंधश्रद्धेपोटी सागरी जीवांसह, वनस्पतींची तस्करी होत असल्याचे ते म्हणाले.

हे वाचा – मी लिहून देतो विधानसभा निवडणूक मुदतीपूर्वी होणार नाही – मुख्यमंत्री

First Published on: March 7, 2019 7:41 PM
Exit mobile version