३० जणांचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

३० जणांचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

डोंबिवलीत एका १५ वर्षीय मुलीवर मागील आठ महिन्यांमध्ये ३० जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून २२ आरोपींना अटक केली आहे. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे.

ही अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहात असून त्याच परिसरात राहात असणार्‍या एका मुलाबरोबर प्रेमसंबंध जुळून आले. या मुलाने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. हे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत आपल्या मित्रांसमवेत देखील शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले होते.

या पीडित मुलीला आरोपींनी व्यसनाधीन बनवले असल्याचे विश्वसनीय वृत्त असून विविध प्रकारचे अमली पदार्थ देत तिला व्यसनाची सवय लावली गेली होती. एकीकडे ब्लॅकमेलिंग आणि अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या पीडितेला या पदार्थांचे आमिष दाखवून ३० जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जात बलात्कार केला.

आरोपींची नावे
विजय फुके, चेतन राठोड, भावेश मस्के, तुषार कसबे, पिंटू पाल, सुमित तायडे, स्वप्नील कदम, साहिल म्हात्रे, जय शेंडगे, गौरव माळी, धीरज पाटील, तनिष सोनावणे, आशिष गायकवाड, अतिश गायकवाड, वैभव गायकवाड, अनुप, अक्षय पवार, दीपक सपकाळ, रजनीश यादव, योगेश, ओमकार गुंजल, कैलास गायकवाड, प्रसाद भिसे, राहुल, संदीप आघव, सुरज पाटील, दर्शन जाधव, जितेश पावशे, अशोक, भावेश म्हस्के भावेशचा मित्र.

मानपाडा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २२ आरोपींना अटक केली आहे. डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे याबाबत तपास करीत आहेत.

मानपाडा पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण
आरपीआय व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात केला आहे. आरोपींना कठोर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा राजकीय पक्षांनी दिला आहे.

First Published on: September 24, 2021 5:20 AM
Exit mobile version