राज्यात ३,८२४ नवे रुग्ण, ७० जणांचा मृत्यू

राज्यात ३,८२४ नवे रुग्ण, ७० जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

राज्यात ३,८२४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८,६८,१७२ झाली आहे. कालच्या तुलनेत राज्यातील रुग्णांच्या संख्येत १२८७ रुग्णांची घट झाली आहे. राज्यात ७१,९१० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, राज्यातील मृतांची संख्या ४७,९७२ वर पोहाचेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.

राज्यात ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १३, नवी मुंबई मनपा ३, नाशिक ३, अहमदनगर ३, पुणे ८, सोलापूर ४, सातारा ५, सांगली ४, जालना ४, लातूर ३, नागपूर ३ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ७० मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

आज ५,००८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७,४७,१९९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१५,०२,४२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,६८,१७२ (१६.२४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४१,०५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,१३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: December 10, 2020 7:57 PM
Exit mobile version