मुंबईच्या बाजारात बाप्पासाठी मिळणार ‘३डी’ जेली मोदक

बाप्पाचे आगमन आता दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाप्पासाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तूंची बाजारात खूपच चंगळ पाहायला मिळत आहे. तसेच बाप्पाच्या आवडीचे मोदक, लाडू मिठाईच्या दुकानात विक्रीकरिता उपलब्ध झाले आहे. बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. आता पर्यंत मुंबईतील बाजारात खव्याचे, रव्याचे, चॉकलेट आणि काजूचे मोदक विक्रीसाठी मिळतात, हे आपल्याला माहित होते.

लक्षवेधी ‘३डी’ जेली मोदक 

मात्र, यंदा बाप्पाकरिता मिळणारे स्पेशल ‘३डी’ जेली मोदक चांगलेच चर्चेत आहे. यंदा मुंबईच्य़ा बाजारात आलेले हे ‘३डी’ जेली मोदक हे सगळ्याचेच लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईच्या पवई भागात कॅफे चालविणाऱ्या प्रिया चमणकर यांनी युनिक थ्रीडी जेली मोदक तयार केले आहेत. हे मोदक कसे बनवायचे याचे प्रशिक्षणही त्या देत आहेत.

हे मोदक बनविण्यासाठी दुध, गुळ, नारळ, नारळाचे दुध, साखर, पाणी या पदार्थांचा वापर केला जात आहे. या मोदकांना साध्या मोदकासारखाच स्वाद आहे. मोदकावर जिलेटीन आर्ट करून फुलांची आकर्षक नक्षी तयार केली आहे. हे मोदक अनेक रंगात बनविता येत असल्याने ते फारच आकर्षक दिसत आहेत. हे मोदक चार दिवस टिकतात. जपान मध्ये थ्रीडी जिलेटीन आर्ट प्रसिद्ध आहेत. त्यावरून प्रेरणा घेऊन प्रिया यांनी हे मोदक बनविले आहेत.

First Published on: August 31, 2019 1:02 PM
Exit mobile version