आपल्यासाठी जीव धोक्यात घालणारे रेल्वेचे ते ४०० ‘सुपरहिरो’!

आपल्यासाठी जीव धोक्यात घालणारे रेल्वेचे ते ४०० ‘सुपरहिरो’!

आपल्यासाठी जीव धोक्यात घालणारे रेल्वेचे ते ४०० 'सुपरहिरो'!

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.अश्या आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू नये, यासाठी भारतीय रेल्वेच्या मालगाड्या अहोरात्र सूरु आहे. तसेच देशातील कोणतीही व्यक्ती या संचारबंदी, कर्फ्यू काळात उपाशी राहणार नाही, या काळजीपोटी स्वतःच्या जीवाची आणि कुटूंबियांची पर्वा न करता दररोज १८ ते २० तास आपली सेवा देण्याचं काम मध्य रेल्वेचे ४०० गुड्स गार्ड करत आहे.

कोरोना विषाणू विरोधात संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहे. शहरासह ग्रामीण भागातील रस्ते सामसूम अन् निर्मनुष्य आहे. एसटी बस, प्रवासी वाहतूक गाड्यांसह देशभरातील रेल्वे सेवा बंद.. या आपत्कालीन परिस्थितीत देशभरात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये म्हणून भारतीय रेल्वेच्या मालगाड्या रात्रं-दिवस सुरु आहे. या मालगाड्या वेळत पोहचण्याची जबाबदारी गु्ड्स गार्डकडे आहे. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीनुसार देशाच्या जनतेला अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदे, फळे आणि भाज्या, पेट्रोलियम उत्पादने,कोळसा या सारख्या जीवनावश्यक वस्तूची गरज असल्याने स्वताःच्या कुटूंबियांची पर्वा न करता मध्य रेल्वेचे ४०० गुड्स गार्ड या जीवनावश्यक वस्तू मालगाडी मार्फत पुरविण्याचे काम करत आहेत. याबरोबर रेल्वे अधिकारी, स्टेशन मास्टर, लोकोपायलट, साहाय्यक लोको पायलट, स्टेशन मास्तर, पॉइंट्स मॅन आपली सेवा बजावत आहे.

या ठिकाणून होते मालगाडी लोड

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ४०० गुड्स गार्ड कार्यरत आहे. या विभागातील गुड्स गार्ड मालगाडीला वसई रोड, कल्याण, जेएनपीटी, लोणावळा, कर्जत, इगतपुरी, ट्रॉम्बे पर्यत घेऊन जाण्याचे काम करतात. यात अनेक साईडिंग आहे जिथे अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदे, फळे, भाजीपाला औषधी सारख्या जीवनावश्यक वस्तूने मालगाडी लोड करतात. इथून संपूर्ण देशाच्या कान्याकोपऱ्यात घेऊन जाण्याचे हे काम गुड्स गार्ड करत आहे.

लॉकडाउनच्या काळात देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा करण्यासाठी आम्ही सर्व गुड्स गार्ड मालगाडीवर अहोरात्र कार्यरत आहे. या कठीण काळात देशाचा कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही, या काळजीपोटी स्वतःच्या जीवाची पर्वा आम्ही आपलं कर्तव्य बजावत आहोत.
– राहुल पांडे, गुड्स गार्ड,पनवेल मध्य रेल्वे

रेल्वेचे गुड्स गार्ड करतात २० तासांची ड्यूटी

लॉकडाऊन काळात लोकांच्या घरात अंधार पडू नये, अन्नधान्याचा तुटवडा भासू नये व आवश्यक सेवासुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वे अधिकारी, स्टेशन मास्टर, लोकोपायलट, साहाय्यक लोको पायलट, रेल्वेच्या गुड्स गार्ड आपली सेवा देत आहेत़ या लोकांमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचविणे शक्य होत आहे़. रेल्वेच्या गुड्स गार्डच्या ड्युटीचा कालावधी ८ ते १० तासांचा असतो. मात्र देशावर उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे जनतेला जीवनावश्‍यक पुरवठा खंडित होऊ नये म्हणून १८ ते २० तास ड्यूटी करत आहे.

अडचणीवर करतात मात

रेल्वेच्या मालगाडीचे गुड्स गार्ड यांचा ब्रेकवान डब्यात मूलभूत सुविधा आज मिळत नाही आहे. ज्यात लाईट, पंखा आणि पाणी उपलब्ध नाही. कारण संचार बंदीमुळे अनेक रेल्वे कर्मचारी यांना सुट्टी देण्यात आली आहे. रेल्वेचा इलेक्ट्रिकल स्टाफ कामावर नाही. मात्र तरी सुद्धा देशावर आलेली परिस्थिती लक्षात घेऊन आणि देश सेवेसाठी कसलीही तक्रार न करता आपले कर्तव्य बजावत आहे.

First Published on: March 31, 2020 4:02 PM
Exit mobile version