CoronaVirus – करोनाचा महाराष्ट्रात ७ वा बळी, ४० वर्षीय महिलेचा मृत्यू!

CoronaVirus – करोनाचा महाराष्ट्रात ७ वा बळी, ४० वर्षीय महिलेचा मृत्यू!

मुंबईत करोनाने आणखी एक बळी घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता करोनाने ७ वा बळी घेतला आहे. मुंबईत पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला.

या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि छातीत दुखू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. मात्र या महिलेचा मृत्यू करोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या ही  महिला आणखी कोणाकोणाच्या संपर्कात आली आहे त्याचा देखील शोध घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १९३ झाली आहे. सात रुग्णांपैकी ४ मुंबईतले तर पुणे, नागपूर आणि सांगली या तीन शहरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण –

दरम्यान मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून, राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले असून, आतापर्यंत मुंबईत
77 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी बघता रस्त्यावर फिरणारे मुंबईकर आता तरी केंद्र सरकारला सहकार्य करून घरात बसणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे

First Published on: March 29, 2020 12:44 PM
Exit mobile version