ट्रकच्या धडकेने ४५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू

ट्रकच्या धडकेने ४५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू

(फोटो प्रातिनिधिक आहे)

मुंबई : कॉटनग्रीन येथे ट्रकच्या धडकेने एका 45 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. रेड्डी असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी ट्रकचालकास अटक केली आहे.

हा अपघात सोमवारी सकाळी पाच ते सहाच्या सुमारास कॉटनग्रीन येथील कॉटनग्रीन पार्किंग लॉटजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी सकाळी पाच वाजता रेड्डी हे पार्किंग लॉटजवळून जात होते, यावेळी एका ट्रकने त्यांना धडक दिली होती, ट्रक अंगावरुन गेल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते, त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी त्यांचे नातेवाईक पैदापुरी सुबाराव श्रीनिवासराव यांच्या तक्रारीवरुन काळाचौकी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली.

First Published on: September 19, 2018 12:40 AM
Exit mobile version