वसई विरार महापालिकेचे 4657 गोविंदाना मोफत विमा कवच

वसई विरार महापालिकेचे 4657 गोविंदाना मोफत विमा कवच

Vasai Virar Municipal Corporation

वसई-विरारमधील 4657 गोविंदांना अपघातात विम्याचे सुरक्षा कवच महापालिकेने दिले आहे. दहिहंडी हा उत्सव राज्य भरात मोठ्या प्रचंड उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. पंधरा ते वीस फूट उंचीचा हंड्या काही ठिकाणी लावल्या जातात. या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथक कसून स्पर्धा करतात. त्यात होणार्‍या अपघाताच्या दृष्टीकोनातून गेल्या काही वर्षापासून गोविंदा पथकांना मोफत विमा योजना महापालिकेने दिली आहे.’

‘गोविंदाचा अपघात विमा’ या योजनेचा लाभ घेणेसाठी महापालिकेने वृत्तपत्राद्वारे तसेच सोशल मिडिया, महापालिकेचे सांकेतस्थळावर प्रसिद्धी दिलेली होती. सुरवातीस या योजनेस अत्यल्प प्रतिसाद होता. परंतु 23 ऑगस्टला 78 गोविंदा पथकांनी महानगरपालिकेत नोंदणी केली असून एकूण 75 पथकातील सुमारे 4657 गोविंदांना महानगरपालिकेने विमा कवच दिला आहे. ज्या गोविंदा पथकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा गोविंदा पथकातील गोविंदाना उत्सवाच्या दरम्यान काही अपघात झाल्यास न्यु इंडिया इन्शुरन्स को.लि. यांचे 0250-2332901, विल्सन नरोन्हा 959476272 तसेच अरुणा जाधव 9011298889 या नमूद क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन क्रीडा विभागाचे उपआयुक्त डॉ.किशोर गवस यांनी केले आहे.

First Published on: August 24, 2019 1:09 AM
Exit mobile version