CoronaVirus – राज्यात रुग्णांमध्ये वाढ, १९३ जाणांना करोनाची लागण!

CoronaVirus – राज्यात रुग्णांमध्ये वाढ, १९३ जाणांना करोनाची लागण!

प्रातिनिधिक छायाचित्र

संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोनाचे संकट असून, राज्यात रोज कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. आज देखील राज्यात ७ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १९३ इतकी झाली आहे.

आज असे आढळले कोरोना रुग्ण – 

दरम्यान आज आढळलेल्या सात रुग्णांपैकी ४ मुंबईतले तर पुणे, नागपूर आणि सांगली या तीन शहरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान कोरोनाचा सामना करण्यासाठी आता राज्यसरकारने खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यास सुरुवात केली आहे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण – 

दरम्यान मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून, राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले असून, आतापर्यंत मुंबईत ७७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी बघता रस्त्यावर फिरणारे मुंबईकर आता तरी केंद्र सरकारला सहकार्य करून घरात बसणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

First Published on: March 29, 2020 1:09 PM
Exit mobile version