ठाण्यात १ कोटी ३८ लाख किमतीचा गांजा जप्त!

ठाण्यात १ कोटी ३८ लाख किमतीचा गांजा जप्त!

टेम्पोची पूर्ण तपासणी केली असता टेम्पोत सुमारे ७०० किलो गांजा

रस्त्याच्या कडेला बेवसाररित्या उभ्या असलेल्या एका टेम्पोमध्ये ७०० किलो गांजा हा अमली पदार्थ मिळून आल्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. चितळसर पोलिसांनी टेम्पोसह गांजा ताब्यात घेतला असून टेम्पो चालकाचा कसून शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर गांजा कुठून कुठे जाणार होता याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती अद्याप पोलिसांना मिळू शकलेली नसून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

७०० किलो गांजा जप्त

ठाण्यातील घोडबंदर रोड येथून शनिवारी पहाटे एक टेम्पो गांजा या अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येत असल्याची माहिती चितळासर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई किरण रावते यांना मिळाली. या माहितीच्या आधारे रावते यांनी चितळासर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मपोनि. प्रियतमा मुठे, सपोनि शशिकांत रोकडे, पोउनि धनराज केदार या पथकाने घोडबंदर रोड येथे शनिवारी पहाटे ३ वाजता रवीस्टील नाका येथे नाकाबंदी लावली.

गांजासह टेम्पो ताब्यात 

दरम्यान तत्वज्ञान विदयापीठ जवळ असणाऱ्या एका पडक्या इमारतीजवळ एका लाल रंगाचा टेम्पो बेवारसरीत्या उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पडक्या इमारतीजवळ जाऊन टेम्पो तपसाला असता टेम्पोत कोणीही आढळून आले नाही, पोलिसांनी टेम्पोमध्ये असलेला माल तपासला असता त्यात मक्याची कणसे आणि त्या खाली ताडपत्री मध्ये लपवून ठेवलेला गांजा हा अमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी गांजासह टेम्पो ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला. टेम्पोची पूर्ण तपासणी केली असता टेम्पोत सुमारे ७०० किलो गांजा सापडला आहे.

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

या गांजाची किंमत १ कोटी ३८ लाख रुपये असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी चितळासर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पो चालकाचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती अंबुरे यांनी दिली. या गांजाची कुठूनकुठे जाणार होता होता याबाबत अद्याप काहीही माहिती पोलिसांना मिळून आलेली नसून टेम्पो चालकाला अटक केल्यानंतर हि माहिती उपलब्द होऊ शकेल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राठोड यांनी सांगितले.


मटका किंग जिग्नेश ठक्कर : बालपणीच्या मित्राने आर्थिक वादातून केली हत्या

First Published on: August 1, 2020 8:14 PM
Exit mobile version